Home हिंदी आमदार हरिष पिंपळे मार्फत गरजूंना शिलाई मशीन चे वाटप

आमदार हरिष पिंपळे मार्फत गरजूंना शिलाई मशीन चे वाटप

736

अकोला ब्यूरो : श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था, मुर्तीजापूर चे अध्यक्ष आमदार हरिष मारोतीआप्पा पिंपळे यांच्या मार्फत गरजूंना शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले.

लाभार्थी वैशाली कांडलकर रा.कुरूम यांचे पती स्व.दीपक कांडलकर यांचे निधन झाल्यामुळे त्यांना उदरनिर्वाहा करिता स्वयंरोजगार चालू करता यावा म्हणून संत गजानन महाराज बहुद्देशीय संस्थेच्या कोषाध्यक्ष नुतनताई हरिषभाऊ पिंपळे यांच्या हस्ते शिलाई मशीन देण्यात आली. बाबुभाऊ देशमुख (भाजपा उपजिल्हाध्यक्ष अकोला ग्रामीण) , भुषण कोकाटे (भाजपा तालुकाध्यक्ष मूर्तिजापूर), किशोर ठाकुर (भाजयुमो उपजिल्हाध्यक्ष अकोला ग्रामीण), संतोष भांडे-उपाध्यक्ष सं.ग.म.संस्था, सुनिल लशुवानी- सचिव, संतोष शिरभाते, भुपेंद्र पिंपळे, पुजाताई पिंपळे, योगेश फुरसुले-सदस्य-स.ग.म.संस्था, सुधीर दुबे, गणेश ठाकरे, न्यानु माहामुने यांची उपस्थिती होती.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).