Home हिंदी कोरोना काळात रुग्णालयांवर अंकुश व नियंत्रण ठेवण्याची पनकुले यांची मागणी

कोरोना काळात रुग्णालयांवर अंकुश व नियंत्रण ठेवण्याची पनकुले यांची मागणी

781

नागपूर ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी बुधवार (२१ ऑक्टोबर) ला मुंबई येथे पक्ष कार्यालयात ना. राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांना कोरोना काळात रुग्णालयांवर अंकुश व नियंत्रण ठेवण्याची मागणी केली. यावेळी ते म्हणाले कि रुग्णांची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात यावे व योग्य औषधोपचार साठा पुरवावा. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सुद्धा दिले.

यावेळी ना. राजेश टोपे म्हणाले कि कोरोना महामारी मार्च अखेरपर्यंत संपूर्ण नियंत्रणात येणार असून नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी. नागपूर येथे कोरोना नियंत्रणात असल्याबद्दल ना. राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ह्या बाबीकडे स्वतः लक्ष देऊन अडचणी असल्यास शासनाकडे सहकार्य मागावे असा सल्लाही त्यांनी या वेळेस दिला. यावेळी प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी सामान्य रुग्णाकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).