
- दयाराम बोगावर 16 लाखांचे आणि त्याच्या पत्नीवर 2 लाखांचे होते बक्षीस
- गडचिरोली पोलिसांची कामगिरी
गडचिरोली : राज्यात नक्षलविरोधी अभियानाला आज मोठे यश मिळाले असून जहाल नक्षलवादी व टिपागड दलमचा कमांडर दयाराम अंकलू बोगा उर्फ यशवंत याला पत्नी शारदा ऊर्फ सुमित्रा पितुराम नेताम हिच्यासह अटक करण्यात आली आहे. गडचिरोली के पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.2
2009 पासून सक्रीय
दयाराम बोगा (वय 35) हा सन 2009 मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाला होता. तेव्हापासून तो नक्षल चळवळीत सक्रिय आहे. त्याच्यावर 78 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यात 6 पोलीस व 18 हत्येचे, 10 जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत.
हत्तीगोटा, मरकेगाव मध्ये सहभाग
हत्तीगोटा, मरकेगाव, दादापूर वाहन जाळपोळ यांसह 1 मे 2019 च्या जांभुळखेडा भुसुरूंग स्फोटातही त्याचा सहभाग होता. विविध 35 नक्षलवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याची माहिती देणाºयासाठी 16 लाखांचे बक्षिसही पोलिसांनी जाहीर केले होते. तर बोगाची पत्नी सुमित्रा नेताम (वय 32) हिच्यावर 35 गुन्हे दाखल असून तिच्यावर 2 लाखाचे बक्षिस होते.