Home हिंदी नागपूर न्यूज बुलेटिन : सीए रोड, गणेश चौक ते गांधीसागर दरम्यान वाहतूक...

नागपूर न्यूज बुलेटिन : सीए रोड, गणेश चौक ते गांधीसागर दरम्यान वाहतूक प्रतिबंधित

837

नागपूर महानगरपालिकेतर्फे सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प अंतर्गत गितांजली चौक सी.ए.रोड ते गणेश चौक ते गांधीसागर तलाव पर्यंतची वाहतूक सीमेंट रोड बांधकामाकरिता प्रतिबंधित करण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

नागपूर महानगरपालिकेद्वारे सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प अंतर्गत गीतांजली चौक सी.ए.रोड ते गणेश चौक ते गांधीसागर पर्यंत सीमेंट रोडचे बांधकाम प्रस्तावित आहे. या कामामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक 30 नोव्हेंबर पर्यंत बंद राहिल. यामार्गावरील वाहतूक गांधीसागर (वाकर रोड) ते पाचपावली रोड मार्गाने दुतर्फा जाईल. इतर वाहतूक अंतर्गत रस्त्यावरून वळविण्यात येईल.


मास्क न लावणा-या 317 नागरिकांकडून दंड वसूली

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (4 नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 317 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 1 लक्ष 58 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी 17100 नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. 69,08,000/- चा दंड वसूल केला आहे.

बुधवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 53, धरमपेठ झोन अंतर्गत 70, हनुमाननगर झोन अंतर्गत 38, धंतोली झोन अंतर्गत 13, नेहरुनगर झोन अंतर्गत 8, गांधीबाग झोन अंतर्गत 17, सतरंजीपूरा झोन अंतर्गत 12, लकडगंज झोन अंतर्गत 10, आशीनगर झोन अंतर्गत 19, मंगळवारी झोन अंतर्गत 73 आणि मनपा मुख्यालयात 4 जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 11630 बेजबाबदार नागरिकांकडून रु 58 लक्ष 14 हजार वसूल करण्यात आले आहे.

नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे.