Home हिंदी What an Idea | धावत्या मेट्रोमध्ये रंगली काव्य मैफिल

What an Idea | धावत्या मेट्रोमध्ये रंगली काव्य मैफिल

686

नागपूर ब्युरो : सिताबर्डी ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान धावत्या मेट्रोमधून 25 कवींनी त्यांची कविता सादर केली. हा अभिनव प्रयोग पहिल्यांदाच नागपूरात करण्यात आला. नागपूर मेट्रोच्या ऑरेंज लाईन मार्गिकेवरून सीताबर्डी इंटरचेन्ज ते खापरी पुन्हा खापरी ते एअरपोर्ट स्टेशन आणि नंतर परतीचा सीताबर्डी पर्यंत असा हा संपूर्ण प्रवास होता. या दरम्यान सर्व साहित्यिकांनी खापरी मेट्रो स्टेशन आणि एयरपोर्ट मेट्रो स्टेशन पाहीले. स्टेशनवरील व्यवस्था आणि सोयी सवलतींचे त्यांनी मनभरून कौतुक केले.

नागपुरातील 25 नामवंत कवींनी एकत्र येऊन नागपूर मेट्रोने प्रवास करत धावत्या माझी मेट्रोमधून एक आगळा वेगळा कार्यक्रम घडवून आणला. धावत्या मेट्रोत या सर्वांनी स्वरचित कवितांचे अभिवाचन केले. सीताबर्डीवरून निघालेली ही काव्यमैफिल मध्ये इंटर्वल घेत खापरी मेट्रो स्टेशनला थांबली. सर्व साहित्यिकांनी खापरी मेट्रो स्टेशन न्याहाळत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे व शंकांचे निरसन करून घेतले. या स्थानकावरून पुन्हा ही साहित्यिकांची मांदियाळी एअरपोर्ट स्थानकापर्यंत मेट्रोने पोचले. या स्थानकाचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर हि सगळी मंडळी स्टेशनच्या तळमजल्यावरील ज्येष्ठांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘विरंगुळा केंद्रात’ पोचले. मंत्रमुग्ध होऊन ‘बापू कुटी’ न्याहाळल्यावर साहित्यिकांनी या भागात लावण्यात आलेल्या ग्रंथालयातील पुस्तकं चाळलीत.

अनेक जण पुस्तक वाचण्यात रमलेली दिसली. त्यानंतर अर्धी राहिलेली काव्य मैफिल परत सुरु करण्यात आली. एकशे एक सरस काव्यांची मेजवानीच इथे श्रोत्यांसाठी प्रस्तुत केली गेली. काव्य मैफिल संपवून सीताबर्डी इंटरचेंजच्या परतीच्या प्रवासाला माझी मेट्रोने हि मांदियाळी निघाली तेव्हा अजूनही उत्साह कायम होता. यातील काही कलावंतांनी नाटुकली आणि नक्कल सादर करून कवी आणि श्रोत्यांचे मनोरंजन केले.

चाकावर धावणारी माझी मेट्रो काव्य मैफिल संपली तेव्हा सगळे साहित्यिक अत्यंत आनंदी दिसत होते. आपल्या शहरातील अत्यंत अल्पावधीत सुरु झालेली हि मेट्रो पाहून आपण विदेशात असल्याचा भास होतो अशी प्रतिक्रिया काही साहित्यिकांनी दिली.. तर स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर मेट्रोद्वारा अत्यंत काळजी घेत जात असल्याचे लक्षात आल्याने इतरांनीही न संकोचता माझी मेट्रोने प्रवास करावा असे काही कवी सांगत राहिले. या धावत्या मेट्रोतल्या काव्य मैफिलीत माधुरी अशीरगडे, मनीषा अतुल, डॉ. अरुंधती वैद्य, डॉ. सुरुची डबीर, डॉ. लीना निकम, विजया बाह्मणकर, अभिषेख बेल्लरवार, विलास वानखेडे असे अनेक कवी सहभागी होते.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).