Home हिंदी Election | खोटारड्या सरकारला धडा शिकविण्यासाठी पदवीधरांचा आवाज बुलंद करा

Election | खोटारड्या सरकारला धडा शिकविण्यासाठी पदवीधरांचा आवाज बुलंद करा

907
  • संदीप जोशी यांच्या संपर्क सभेत खासदार रामदास तडस यांचे आवाहन

  • कारंजा, आष्टी, आर्वी, पुलगाव, देवळी येथे संपर्क दौरा

वर्धा ब्यूरो : पदवीधर मतदारसंघ हा सुशिक्षित, जाणकार, अभ्यासू लोकांचा मतदारसंघ आहे. समाजातील समस्या, येथील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या मतदारसंघाचे प्रतिनिधी करत आलेले आहेत. आजपर्यंत पंडीत बच्छराज व्यास, गंगाधरराव फडणवीस ते पुढे ना. नितीन गडकरी, प्रा.अनिल सोले यांनी चोखपणे पदवीधरांचे प्रतिनिधीत्व केले आहे. पक्षाचा गड राहिलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याची जबाबदारी आता पक्षाने नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर सोपविली आहे. तो कायम राहणार यात कुठलीही शंका नाही.

राजकीय आणि प्रशासकीय बाबींचा उत्तम अभ्यास असलेले योग्य उमेदवार पक्षाने दिले आहेत. संदीप जोशी पदवीधरांचे प्रतिनिधित्व करताना विभागातील प्रत्येक प्रश्नांना न्याय देतील हा विश्वास आहे. यासोबतच विदर्भावर होत आलेला आणि आताही महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वात होणाऱ्या अन्यायाविरूद्धही संघर्ष करतील यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पदवीधर मतदारांनी नेहमी विदर्भाला सावत्र वागणूक देणाऱ्या या खोटारड्या बिघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी तरुणांचा, पदवीधरांचा, बेरोजगारांचा संदीप जोशी हा आवाज बुलंद करा, असे आवाहन वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी केले.

संदीप जोशी यांनी शुक्रवारी (ता.20) वर्धा जिल्ह्यातील कारंजा/घा., आष्टी, आर्वी, पुलगाव, देवळी येथे संपर्क दौरा केला. यावेळी झालेल्या सभेमध्ये खासदार रामदासजी तडस बोलत होते. संपर्क दौऱ्यामध्ये विविध ठिकाणी खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेमध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादाराव केचे, भाजपचे वर्धा जिल्हा अध्यक्ष डॉ.शिरीष गोडे, संघटन महामंत्री अविनाशजी देव, वर्धा जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेश बकाने, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुधीर दिवे, संघटन महामंत्री अविनाशजी देव, संदीप काळे, भाजपा युवा मोर्चा वर्धा जिल्हा अध्यक्ष वरूण पाठक, सुनील गपाट, कमल गोलधरीया, शिरीष भांगे, मुकुंद बारंगे, कमलाकर निभोरकर, आष्टी पंचायत समिती सदस्य रेखाताई मतले, सुरेश खवशी, चक्रधर डोंगरे, संजय कदम, आर्वी नगराध्यक्ष विनय देशपांडे, सभापती हणमंतराव चरडे, भाजपा पुलगाव शहर अध्यक्ष नितीन बडगे, पुलगाव नगराध्यक्ष शीतल घाटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार, शिक्षण परिषदेचे ज्येष्ठ सदस्य बाबाराव देशमुख, राजीव जयस्वाल, राजीव बत्रा, मंगेश झाडे, दीपक फुलकरी, सुनीता राऊत, किशोर भवाडकर, संजय गाथे,
आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना खासदार रामदास तडस म्हणाले, विदर्भावर सातत्याने अन्यायच होत आला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या मागील 5 वर्षात विदर्भाला न्याय मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा विदर्भ अन्यायाच्याच खाईत लोटला जात आहे. वर्धा जिल्ह्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेकेवळ 58 लाख रुपये दिले. दुसरीकडे मराठवाड्यातील एकेका जिल्ह्याला 200 कोटी दिले. आमच्या विदर्भातील सोयाबीनला 10-20 रुपये भीख देणारे हे सरकार निधीसाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत स्वतः हात वर करतेय. अशा या मग्रूर सरकारला धडा शिकविण्यासाठी पदवीधर मतदारसंघ निवडणूक ही मोठी आहे. त्याचे सोने करा, तरुण, पदवीधर, बेरोजगारांचे प्रश्न जाणणाऱ्या संदीप जोशींना पहिले पसंतीक्रम द्या, असेही आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).