Home हिंदी Good News। आता आपला वाढ दिवस साजरा करा धावत्या मेट्रोत

Good News। आता आपला वाढ दिवस साजरा करा धावत्या मेट्रोत

680

नागपूर ब्यूरो : महा मेट्रोतर्फे नागरिकांकरिता सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ नावाची अनोखी योजना आखण्यात आली आहे. आता फक्त 3 हजार रुपयामध्ये वाढदिवस, प्री-व्हेंडिंग शूट, लग्नाचा वाढदिवस व इतर कार्यक्रम साजरा करू शकतात. `सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ या अनोख्या योजनेंतर्गत नागपूरकर आता मेट्रो मध्ये आनंद साजरा करू शकतात.

महा मेट्रोच्या या उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून नागरिक या करता बुकिंग देखील करीत आहे. ही योजना सर्वांकरिता खुली असून नागरिक तसेच इव्हेंट ऑर्गनायझर देखील याचा लाभ घेऊ शकतात. 3 कोचच्या मेट्रो मध्ये कोरोना पार्श्वभूमीमुळे जास्तीत जास्त फक्त 150 व्यक्ती आमंत्रित करता येईल व 1 तासा करिता फक्त रु. 3 हजार रुपए मोजावे लागतील. अतिरिक्त वेळ करिता 2 हजार रुपए प्रति तास द्यावे लागतील. ज्यामध्ये मेट्रो कोचला आकर्षक पद्धतीने सजविण्यात येईल.

सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ चे नियम

– 3 कोचची एक मेट्रो
– फक्त 150 व्यक्ती आमंत्रित करता येईल (कोरोना पार्श्वभूमीमुळे)
– स्टेशन येथे वेलकम अनांउन्समेंट,
– फ्लेक्स/बॅनर्स
– फोटो व व्हिडीयोग्राफी
– केक कटिंग (सुरक्षेअभावी मेणबत्तीचा उपयोग करता येणार नाही)
– बंद डबा असलेले रिफ्रेशमेंट
– मेट्रो तर्फे ट्रेन मध्ये हाऊसकिपींग स्टाफ
– कोविड – 19 च्या सर्व नियमावली पाळणे आवश्यक
– 7 दिवसापूर्वी मेट्रो भवन येथे बुकिंग करणे आवश्यक.

वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).