Home हिंदी शांतीवनात महामानवास अभिवादन करण्यास उसळला जनसागर

शांतीवनात महामानवास अभिवादन करण्यास उसळला जनसागर

773

नागपूर ब्यूरो : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महाप्रयाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध परिषदेच्या वतीने कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन केले नसताना ही शेकडो अनुयायी अभिवादन करण्यास जमले होते.

संस्थेच्या वतीने परिस्थिती लक्षात घेता covid-19 च्या प्रादुर्भाव च्या अनुषंगाने सर्व खबरदारी घेण्यात आली. हँड सॅनिटाझर व सोशल डिस्टन्स चा वापर करण्यात आला होता. तोंडाला मास्क असल्या शिवाय कुणालाही परिसरात प्रवेश दिला गेला नाही. प्रशासनाच्या वतीने सुरक्षा करिता बंदोबस्त लावण्यात आला होता.

तत्पूर्वी भारतीय बौद्ध परिषदेने भगवान बुद्ध , बाबासाहेब, गोपिकाबाई ठाकरे, धम्मसेनापती गोडबोले, यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अस्थीकलशाला अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी प्रकाश गजभिये, संजय पाटील, शेखर गोडबोले, प्रदीप लामसोंगे, प्रकाश सहारे, चंद्रामनी लावत्रे, संजय चहांदे, प्रवीण पाटील, प्रल्हाद खोब्रागडे, मून व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).