Home हिंदी सर्वक्षेत्रातील 1 लक्ष बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करणारा ऑनलाईन मेळावा

सर्वक्षेत्रातील 1 लक्ष बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करणारा ऑनलाईन मेळावा

756
  • नागपूर शहरासाठी 4 हजार, विभागासाठी 8.5 हजार रोजगार
  • फक्त ऑनलाईन नोंद करा, संधीचा लाभ घ्या

नागपूर ब्यूरो : कोरोना महामारीने अनेकांच्या अर्थाजनावर गदा आली. कोरोनातुन हळूहळू आर्थिक चक्र पूर्वपदावर येत आहे. त्यामुळेच कौशल्य विकास विभागातर्फे शहरात 4 हजार तरूण-तरुणींना उद्योजकता व रोजगार विभागातर्फे रोजगार मिळणार आहे. संपूर्ण राज्यातून महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 1 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत.

येत्या 12 व 13 डिसेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत एक राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याअनुषंगाने आयुक्तालयामार्फत http//www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर रोजगार मेळाव्याचा आयोजन करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री करणार असून त्यामध्ये मंत्री नबाब मलिक, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रातून 1 लाख उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये नागपूर विभागाला 8 हजार 500 उमेदवारांचे लक्ष्य दिलेले असून नागपूर शहराला 4 हजार उमेदवारांचे लक्ष्य दिलेले आहे. यामध्ये उच्च शिक्षित उमेदवारांपासून ते अशिक्षित उमेदवारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार असून डॉक्टर, नर्स, रुमबॉय, एचआर, मॅनेजर, गार्ड पर्यंत तसेच आयटीआय प्रशिक्षण प्राप्त टर्नर, फिटर, प्लंबर, मशिनिस्ट, मोटार मॅकनिक, डिझेल मॅकेनिक, सीएनसी ऑपरेटर, ब्रायलर अटेंडंट, कुशल व अकुशल कामगार, तंत्रनिकेतन पदविका, अभियांत्रिकी पदवी, कृषी पदवीधर, व्यवस्थापनातील पदवी, लेखापाल इत्यादी विविध क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. आतापर्यंत 2.5 हजार ते 3 हजार पर्यंत निरनिराळ्या क्षेत्रातील जागांबाबत मागणी प्राप्त झालेली असून येत्या दोन-तीन दिवसात 4 हजार जागांबाबत मागणी प्राप्त होण्याची शक्यता आहे.

उद्योजकता नोंदणी या सदर महारोजगार मेळावा ही उद्योजक व बेरोजगार उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी असून याचा लाभ सर्व संबंधितांनी घ्यावा. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक आस्थापना, हॉटेल्स, मॉल, दवाखाने व निरनिराळे औद्योगिक संस्थांनी त्यांच्या आस्थापनांमधील रिक्त पदे भरण्याकरिता सदर वेबपोर्टलवर नोंदणी करून मागणी नोंदवावी. मेळाव्यामध्ये आपला सहभाग घेण्याकरिता उद्योजकांनी व उमेदवारांनी http//www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पेार्टलवर भेट द्यावी. उमेदवार Mahaswayam App हे ॲप आपल्या स्मार्ट अँडरॉईड मोबाईल वर डाऊनलोड करून सुध्दा या सुविधांचा लाभ घेवू शकता. एका अर्थाने नोकरीच्या शोध आता आपल्या हाताच्या तळव्यावर उपलब्ध झालेला आहे.

महारोजगार मेळाव्यासाठी कोणताही नोंदणी शुल्क नसून सदर मेळाव्यामध्ये मोफत सहभाग घेता येणार आहे. तरी सर्व आस्थापना व नोकरी ईच्छुक उमेदवारांना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन प्र. गं. हरडे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर यांनी केलेले आहे.

हे करा-
  1. उमेदवारांनी मोझिला फायर किंवा गुगल क्रोम या ब्राऊजरचा वापर करून या विभागाचे वेबपोर्टल http//www.rojgar.mahaswayam.gov.in ओपन करावे.
  2. नोकरी साध म्हणून आपल्या युजरनेम व पासवर्डवरून लॉगीन करावे उमेदवारांनी यापूर्वी नोंदणी केली नसल्यास नोंदणी प्रक्रीया पूर्ण करावी.
  3. स्क्रिनवर डाव्याबाजूस दिसणाऱ्या पंडीत दीनदयाल उपाध्याय जॉब फेअर या टॅबमध्ये ऐच्छिक जिल्ह्याची निवड करून फिल्टर या पर्यायावर क्लिक करावे.
  4. स्क्रिनवर दिसणाऱ्या पर्यायापैकी व्हेकेंसी लिस्टींग या पर्यायावर क्लिक करून येणारा संदेश कळजी पुर्वक वाचावा व आय ॲग्री बटनावर क्लिक करावे.
  5. रोजगार मेळाव्यात पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, कौशल्य यानुसार प्राधान्यक्रम निश्चित करून इच्छुक पदांना अप्लाय करावे.
  6. मनुष्यवबळाची मागणी असणाऱ्या उद्योजकांनी मोझिला फायर फॉक्स किंवा गुगल क्रोम या ब्राऊजरचा वापर करून या विभागाचे वेबपोर्टल http//www.rojgar.mahaswayam.gov.in ओपन करावे.
  7. ज्या उद्योजकांची नोंदणी नसेल त्यांनी प्रथम आपली नोंदणी करून घ्यावी. नंतर त्यांनी नियोक्ता नोकरी सूची या मेनूवर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या युझर आयडी व पासवर्ड वरून लॉगीन करावे.
  8. डाव्या बाजूला दीनदयाल रोजगार मेळावा या ऑप्शनवर क्लिक करून स्टेट लेवल रोजगार मेळावा असलेल्या कॉलममधील व्ह्यु ऑप्शन क्लिक करावे ॲग्री बटनला क्लिक करून पदांची माहिती भरावी.

    वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).