Home हिंदी संदेश : चला भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा पाठवू या …

संदेश : चला भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा पाठवू या …

877
जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरू असून भारतातही या विषाणूविरोधातील लढाई सुरू आहे. अशात 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन (independence day 2020) आहे. कोरोनाच्या या संकटकाळात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. कोरोना लक्षात घेत सर्व नियमांचे पालन करत लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन साजरा झाला आणि जे लोक घरी आहेत, ते टीव्हीवर हा सोहळा पाहून, तसेच एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवून हा दिवस साजरा करीत आहेत.

15  ऑगस्ट 1947 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस. याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. शेकडो लोकांच्या रक्ताने लाल झालेल्या भारताची मातीने स्वातंत्र्याचा आजचा दिवस पाहिला. या खास दिवशी, आपल्या प्रियजनांना याबद्दल आठवण करून देणे सहाजिकच आहे. एकमेकांना शुभेच्छा देतात. म्हणूनच काही प्रसिद्ध विचार, महान नेत्यांचे विचार आपण स्वांतंत्र्य दिनानिमित्त पुन्हा आठवू या….

> आपले स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही. संघर्ष करून आपण ते साध्य केले आहे. म्हणूनच स्वातंत्र्यदिन हा अभिमानाचा दिवस आहे.

> एक व्हा. भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवा आणि राष्ट्रध्वजाची मूल्ये टिकवून ठेवण्याची शपथ घ्या. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, २०२०.

स्वातंत्र्याबद्दल थोरांचे विचार …

> स्वातंत्र्य मिळवणे सोपे काम नाही. पण त्याशिवाय जगणे कठीण आहे. म्हणून आपले पहिले कर्तव्य कोणत्याही किंमतीवर स्वातंत्र्यप्राप्ती करणे – महात्मा गांधी

> स्वतंत्र होणे म्हणजे केवळ बेड्या तोडून टाकणे नाही, तर इतरांचा सन्मान वाढेल आणि त्यांना स्वांतत्र्य मिळेल अशा प्रकारचे जीवन जगणे म्हणजे स्वातंत्र्य- नेल्सन मंडेला