Home हिंदी Nagpur | सिलेंडर दरवाढीचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस ने केला निषेध

Nagpur | सिलेंडर दरवाढीचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस ने केला निषेध

797

संविधान चौक येथे सिलेंडर वर चूल पेटवुन अनोख्या पद्धतीने केले आंदोलन

नागपूर ब्यूरो : केंद्रातील भाजप सरकारने घरगुती गॅस सिलेंडर वर अन्यायकारक दरवाढ करून सामान्य गृहिणीचे कंबरडे मोडून गोरगरिबांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे सोमवारी संविधान चौक येथे सिलेंडरवर चूल पेटवून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकार विरोधात नागपूर विभागीय महिला उपाध्यक्ष व नागपूर शहराध्यक्ष अलका कांबळे यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मागील पंधरा दिवसांमध्ये केंद्रातील भाजप सरकार ने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती मध्ये 100 रुपयांनी दरवाढ केली आहे. मागील एक वर्षांमध्ये कोरोना काळात लोकांच्या रोजगारांचा प्रश्न निर्माण झाला तर अनेकांचे रोजगार बुडाले. भांडीकुंडी, घरगुती काम करणाऱ्या महिलाही कोरोना काळात बेरोजगार झाल्यात. त्याचप्रमाणे कोरोना काळात दैनंदिन वापरातील वस्तू, अन्न धान्य आदींच्या किमतीतही प्रचंड वाढ झाली, याच काळात जनतेला सिलेंडरच्या किमतीमध्ये सूट हवी असताना केंद्रातील भाजप सरकारने सिलेंडरच्या किंमतीत शंभर रुपयांनी दरवाढ केली, हा प्रकार अतिशय निंदनीय असून जनतेच्या भावनांशी खेळ आहे असा घणाघाती आरोपही नागपूर विभागीय उपाध्यक्ष व नागपूर शहराध्यक्ष अल्का कांबळे यांनी केला आहे.

यावेळी शोभा भगत, रेखा गौर, इंदिरा मंडल, सोनी मंडल, माया गजभिये, सुनिता खत्री, सीमा पतील, दीपा वाघमारे , पुष्पा नंद गाये, सुधा जैन, रेश्मा हाटे, सुनिता मीना भैसारे, शहाजहान शेख, आम्रपाली मेश्राम, लांजेवार, सीमा सहारे, वर्षा रामटेके, सुधा फोफरे आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).