Home मराठी Success | मुस्लिम खाटीक समाजातून अफशा देशातील पहिली महिला पायलट

Success | मुस्लिम खाटीक समाजातून अफशा देशातील पहिली महिला पायलट

652

मुंबई ब्यूरो : भाईंदर पश्चिम भागात राहणारी अफशा कुरेशी (Afsha Qureshi) ही मुस्लिम तरुणी गरुडझेप घेत वैमानिक पदावर रुजू झाली आहे. मुंबईत शिक्षण घेऊन अमेरिकेत पायलट लायसन्सचा अभ्यासक्रम तिने पूर्ण केला होता. परदेशात नोकरी मिळवणे शक्य असतानाही अफशाने आपल्या मातृभूमीला प्राधान्य देत भारतात नोकरी करण्याचा निर्णय घेतला.

खाटीक समाजातून असलेली अफशा कुरेशी ही देशातील मुस्लिम खाटीक समाजातील पहिली महिला पायलट ठरली आहे. तिने गाठलेलं यशाचं शिखर, सुरु असलेला शुभेच्छांचा पाऊस आणि समाजात मिळत असलेल्या प्रतिष्ठेमुळे अफशाच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

भारतातच राहून देशसेवा करण्याची इच्छा अफशाने व्यक्त केली आहे. कुटुंबीय आणि गुरुंचा आपल्या यशात मोठा वाटा असल्याचे सांगत वडिलांनी दाखवलेल्या विश्वास आणि प्रेमामुळे हे यश मिळाल्याचे अफशा सांगत आहे.

मुस्लिम समाजात अजूनही महिलांना काही रीतीरिवाजाप्रमाणे वागणूक दिली जाते. अनेक तरुणींचे अल्प यात लग्न लावून दिले जाते तर अनेक तरुणींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. अशात अफशाने आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवून इतर महिलांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे.