नागपूर ब्यूरो : शुक्रवार, 1 जानेवारी 2021 ला उमरेड पवनी कऱ्हांडला अभयारण्य येथील कर्मचाऱ्यांनी कऱ्हांडला गेट वर सकाळ पासून संप पुकारला आहे.
मागील 7 वर्षा पासून सतिघाट तलाव व रानबोडी तलाव जंगल भ्रमती साठी सुरु होते पण 1 ऑक्टोबर 2020 पासून हा परिसर जंगल भ्रमती साठी बंद करण्यात आला. कोणतेही कारण नसताना असा निर्णय घेण्यात आल्याने वन्यप्रेमीनी कऱ्हांडला कडे आपली नाराजी दाखवली आहे.
या गेट वरील सर्व मार्गदर्शक यांनी सतिघाट तलाव, रानबोडी तलाव चालू करावे ही मागणी केली पण वन विभाग वन्यजीव नागपूर यांच्या कडून कोणताहि प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बेमुदत संप पुकारण्यात आल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.