नागपूर ब्यूरो : उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी पाचपावली सुतिका गृहाचे आकस्मिक दौरा करुन तिथल्या अग्निशमनाचे उपकरणाची पाहणी केली. त्यांच्या सोबत आरोग्य विभागाचे सभापती विरेन्द्र कुकरेजा उपस्थित होते.
श्रीमती धावडे यांच्या तपासणीअंती पाचपावली सुतिका गृहाचे अग्निशम नियंत्रण उपकरण अद्यावत असल्याचे आढळुन आले. रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी केलेली खाटांची व्यवस्था, औषधीची व्यवस्था पाहुन त्यांनी समाधान व्यक्त केले. इथली साफ-सफाई ची व्यवस्था सुध्दा त्यांनी पाहिली आणि आवश्यक निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले. या केन्द्रामधून कोव्हिड ची लस सुध्दा लावण्यात येणार आहे, त्याचासुध्दा आढावा त्यांनी घेतला. तसेच त्यांनी दवाखान्यात भरती असलेल्या महिला रुग्णांकडून त्यांना मिळण्यात येणा-या सुविधांबददल विचारणा केली.
यावेळी डॉ.संगिता खंडाईत, डॉ. सुषमा खंडागळे यांनी उपमहापौरांना रुग्णालयातील संपूर्ण माहिती दिली.
भंडारा जिल्हा रुग्णालयात दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेत कुठलिही कमतरता राहु नये म्हणून पाचपावली सुतिका गृहाची आकस्मिक तपासणी श्रीमती धावडे यांनी केली. कुकरेजा यांनी सुध्दा सुतिकागृहात व्यवस्थेबददल समाधान व्यक्त केले.