Home Maharashtra Nagpur | यावर्षात रस्त्यांचे ब्लॅक स्पॉट दूर करणार: विद्याधर सरदेशमुख

Nagpur | यावर्षात रस्त्यांचे ब्लॅक स्पॉट दूर करणार: विद्याधर सरदेशमुख

629

नागपूर ब्युरो : सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे 18 जानेवारी ते 17 फेब्रुबारी या कालावधीमध्ये राष्ट्रीय रस्ता
सुरक्षा महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर यांच्या वतीने
मुख्य अभियंता कार्यालय परीसरातील सभागृहात “32 वा रस्ता सुरक्षा महिना-2021” विविध कार्यक्रमासह
नुकताच बुधवारी आयोजीत करण्यात आला.

या कार्यकमाला विद्याधर सरदेशमुख, अधीक्षक अभियंता, सां.बां.मंडळ, नागपूर राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता, सा.बां. मंडळ, गडचिरोली, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त राजु वाघ, जनआक्रोशचे रमेश शहारे, जनार्दन भानुसे, कार्यकारी अभियंता, यांनी रस्ते सुरक्षा संबधी विविध बाबीवर संकल्पना मांडून रस्ते सुरक्षा विषयी जन जागृती केली. या वेळी नागपूर मंडळा अंतर्गत येणारे संपुर्ण रस्ते तपासुन त्यामधील काही त्रुटी किंवा ब्लॅक स्पॉट अपघात जन्य जागा असल्यास त्याची पुन:रचना व दुरूस्ती करण्याचे निर्देश विद्याधर सरदेशमुख, अधीक्षक अभियंता यांनी दिले.

या कार्यक्रमात वाहतूक नियमांविषयी प्रश्न मंजूषा कार्यक्रम जनआक्रोश व्दारे घेण्यात आला यास सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भरपूर प्रतीसाद दिला. या प्रसंगी रस्ते नियमांचे पालन करण्याची शपथ राजू वाघ यांचे व्दारे सर्व उपस्थितांनी घेतली. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, मिलींद बांधवकर, येरखेडे, अंभोरे, भोयर, कुचेवार, जया ठाकरे, धर्मेद्र वर्मा व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सा.बां. विभागाचे चंद्रशेखर गिरी, उपविभागीय अभियंता तसेच टेंभूर्णे व राजेंद्र बारई यांनी केले.