विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी, सरकार गंभीर नसल्याचा आरोप
नागपूर ब्यूरो: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पाहिजे तेवढ्या गंभीरतेने कारवाई होतांना दिसत नाही. या प्रकरणी व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिप्स पुरेशा स्पष्ट असल्याने त्याच्या आधारावर पोलिसांनी स्वत:हून कारवाई केली पाहिजे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे माध्यमांशी बोलताना केले.
पूजा चव्हाण प्रकरणी सत्य बाहेर आलेच पाहिजे !#JusticeForPoojaChavan pic.twitter.com/GK2SG8Fedq
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) February 14, 2021
पोलिस स्यू मोटो कारवाई करताना दिसत नाही. यावरून पोलिस कोणाच्या तरी दबावात आहेत का, असा प्रश्न निर्माण होत आहे. या आॅडिओ क्लिपमधील आवाज कोणाचा आहे सगळ्यांनाच माहित आहे. पोलिसांनाही हे माहित आहे. तरी देखील त्यांच्याकडून लपवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यानंतरही वारंवार आवाज कोणाचा आहे, या विषयी शंका उपस्थित करण्यात येत आहे. पहिल्यांदा या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे.
मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातील माहिती नीट घ्यावी. म्हणजे कोण कोणाला जीवनातून उठवित आहे, हे त्यांना कळेल. त्यांच्या बोलण्यातून या संबंधीचे गांभीर्य दिसून आले नाही, असे फडणवीस म्हणाले. चंद्रकांतदादा पाटील आपल्या गावातून दुसऱ्या गावात आले तरी निवडून आले. आमचे राज्यस्तरीय नेते कुठूनही उभे राहिले तरी ते निवडून येतात, हेच यातून दिसून येते, असा टोला फडणवीस यांनी शरद पवारांना हाणला.