मुंबई ब्युरो : युनिक फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय शेरेबाजीमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं रिलीज झाले आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर हे गाणे शेअर केले आहे. ‘ये नयन डरे डरे’ असे या गाण्याचे नाव आहे. त्यामुळे आता अमृता यांच्या आतापर्यंतच्या गाण्यांप्रमाणे हे गाणेही हीट ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं
यापूर्वी अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केले होते. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं आहे. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीनं हे मुळ गाणं गायलं आहे. या गाण्यात लिओनेलने एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडल्याचंही दाखवण्यात आलं आहे. हेच गाणं आता अमृता फडणवीस यांनी गायलं आहे.
Presenting for u only 🌹with lots of 💕"Ye Nayan Dare Dare'-magical mesmerising melodious masterpiece of @saregamaglobal ! All through this romantic song, I enjoyed being my own valentine & believe me it was freaking amazing! Watch 👉https://t.co/p342uSKcPJ #valentinesday2021 pic.twitter.com/C3Zd6mih5G
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 14, 2021
अमृता फडणवीस यांनी हे गाणं पोस्ट करताना हे आपलं आवडतं गाणं असल्याचं म्हटलं. त्यांनी याआधी देखील अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडचे शहणशाह अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक अल्बम देखील रिलिज झालेला आहे.
यशोमती ठाकूरांकडून कौतुक
काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमृता फडणवीस यांच्या एका गाण्याची तारीफ केली होती. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेले ‘तिला जगू द्या’ हे गाणे तेव्हा चांगलाच चर्चेचा विषय ठरले होते. तसेच ‘तिला जगू द्या’ या गाण्याच्या माध्यमातून स्त्री शिक्षण आणि सबलीकरणाचा संदेश देण्यात आला होता. या गाण्याला यूट्युबवर लाखो हिटस् मिळाले होते.