Home मराठी 18 फेब्रुवारी पासून एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ पर्यंत शटल बस सेवा...

18 फेब्रुवारी पासून एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ पर्यंत शटल बस सेवा नागरिकांच्या सेवेत

715

खापरी मेट्रो स्टेशन ते मिहान परिसरात, मेट्रो रेल फिडर सर्विस देखील सुरु होणार

नागपूर ब्युरो : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर 15 मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून आता एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथून विमानतळ पर्यंत जाण्याकरिता शटल बसची सुविधा गुरुवार, दिनांक 18 फेब्रुवारी पासून नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहे. महा मेट्रो, नागपूर महानगरपालिका व मिहान इंडिया लिमिटेडच्या संयुक्त विद्यमानाने एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते डॉ. बाबासाहेब आंतराराष्ट्रीय विमानतळ व डॉ. बाबासाहेब आंतराराष्ट्रीय विमानतळ ते एयरपोर्ट मेट्रो स्टेशन पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सदर बस ही इलेक्ट्रिक बस असून यामध्ये मोठ्या प्रमाणात सामान ठेवण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्यामुळे नागरिकांना सहजपणे विमानतळ पर्यंत पोहचता येईल. एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ पर्यंत इलेक्ट्रिक बसचे तिकीट दर हे शासकीय दरानुसार असेल. ही शटल बस सेवा सकाळी 8 वाजता पासून रात्री 8 वाजता पर्यंत नागरिकांन करिता उपलब्ध असेल.स्वच्छ, सुरक्षित,वातानुकूलित,आरामदेय व पर्यावरणपूरक मेट्रोचा व फिडर सर्विसचा उपयोग करून प्रदूषण कमी करण्यास नव्कीच मदत होईल.

खापरी मेट्रो स्टेशन ते मिहान मेट्रो रेल फिडर सर्विस :
या व्यतिरिक्त महा मेट्रो आणि इंडिया पॅसिफिक ट्रॅव्हल्सच्या संयुक्त विद्यमाने खापरी मेट्रो स्टेशन ते मिहान परिसरात ये-जा करण्याकरिता मेट्रो रेल फिडर सर्विस उपलब्ध करून देण्यात येत असून सदर फिडर सर्विस देखील 18 फेब्रुवारी 2021 पासून नागरिकांच्या सेवेत कार्यरत असेल.मुख्य म्हणजे सदर फिडर सर्विसचे भाडे हे शासकीय दरानुसार असतील. महा मेट्रोने इंडिया पॅसिफिक ट्रॅव्हल्स कंपनी सोबत सामंजस्य करार केला असून जास्तीत नागरिकांना मेट्रो रेल प्रकल्पाशी जोडण्याचा महा मेट्रोचा मानस आहे.

खाली दिल्या प्रमाणे मेट्रो रेल फिडर सर्विस कार्यरत असेल :
• खापरी मेट्रो स्टेशन ते एम्स हॉस्पिटल, कॉनकोर, एचसीएल, टीसीएस, मिहान येथील डब्ल्यू इमारत, ल्युपिन,  हेक्सावेयर इत्यादी कंपनी परिसरा पर्यंत फिडर सर्विस उपलब्ध असेल.