Home मराठी Nagpur | पेट्रोल-डिझेल, गॅस, खाद्य तेल व महागाई च्या विरोधात कांग्रेसचे सायकल...

Nagpur | पेट्रोल-डिझेल, गॅस, खाद्य तेल व महागाई च्या विरोधात कांग्रेसचे सायकल रॅली काढून आंदोलन

नागपूर ब्यूरो: ब्लॉक क्रमांक 4 प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार व काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात पेट्रोल डिझेल गॅस इंधन व खाद्य तेल व महागाई च्या विरोधात आज ब्लॉक क्रमांक चार अध्यक्ष प्रवीण गवरे व वार्ड अध्यक्ष राहुल अभंग व प्रभाग अध्यक्ष रोशन बुधबावरे यांच्या नेतृत्वात दिघोरी चौक ते नंदनवन पेट्रोल पंप पर्यंत भव्य सायकल रॅली काढून आंदोलन करण्यात आले. आंदोलनात प्रभाग 28 चे अध्यक्ष रोशन बुद्ध बावरे, विवेक सोरते, रामभाऊ सोनटक्के, विलास गावंडे, नितीन मोंढे, अली भाई, लतीफ भाई, प्रकाश ढगे, चंद्रनाथ भागवतकर, वसंता लोनदासे, मधु पडोळे, महेश वैरागडे, नितीन चौधरी, अनिल वराडे, प्रेमानंद खरड, दुधराम तिजारे, गंगाधर कडूकर, विकास मेश्राम व महिला काँग्रेसच्या वीणाताई कुकडे, रंजनाताई कडूकर, व युवक काँग्रेसचे सौरभ काळमेघ, अनिकेत खुरे, शुभम लांजेवार, रोहन वांढरे, सुजल श्रीखंडे, सतीश शर्मा, आदर्श चकोले , कुणाल चौधरी, हर्षल जावळकर, दीपांशु सिंगनजुडे , सोहम तिखट, रूणाल पोटे, आलोक मांगे इत्यादि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.