नागपूर ब्युरो : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव गिरीश पांडव आज अशी व्यक्ती आहे, जी समाजातील तळागळातील लोकांसाठी सतत झटत असते. जेव्हा लोक लस घेण्यासाठी घाबरत होते, तेव्हा गिरीश पांडव यांनी समोर येऊन लस घेऊन लोकांमध्ये लस घेण्याबाबत जनजागृती केली. ते इतक्यातच थांबले नाहीत तर स्वतः बस पाठवून ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना नागपूर वरून पाचगाव सेंटर येथे घेऊन जाऊन एकूण 11273 लोकांचे त्यांनी लसीकरण केले.
गिरीश पांडव यांचा दूसरा चेहरा धार्मिक आयोजनात, उत्सवात दिसून येतो. ते अश्या कार्यक्रमात हिरीरीने भाग घेतात. मुख्य म्हणजे दर वर्षी शिवजयंतीच्या दिवशी ते युवकांमध्ये उत्साह भरतात. त्यांच्या उपस्थिती ने उत्सवाचे स्वरूपाचं पार बदलून जाते.
महाराष्ट्र काँग्रेस चे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या उत्साहाने पूर्ण -दक्षिण नागपूर चे युवक महिला व ज्येष्ठ नागरिकांना आपल्या सोबत घेऊन व स्वतः गाडी चालवून ते सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जंगी स्वागतास गेले. गिरीश पांडव यांनी नाना पटोले यांचे भव्य स्वागत केले.
रक्तदानासाठी पुढाकार
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव गिरीश पांडव यांच्या व्यक्तित्वाची महत्वाची बाब ही देखील आहे की जेव्हा महाराष्ट्र शासनाकडे रक्ताचा तुटवडा होता तेव्हा स्वतः समोर येऊन गिरीश पांडव यांनी युवकांमध्ये रक्तदानासाठी जनजागृती केली आणि रक्ताची कमतरता त्यांनी भरून काढली.
गिरीश भाऊ पांडव यांनी पवनसुत नगर रमणा मारोती येथील बंद झालेल्या टाकीचे काम चालू करण्यासाठी व लोकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये व लोकांना भरपूर पाणी मिळावे या उद्देशाने नागपूर चे मनपा आयुक्त यांना निवेदन दिले. यावेळी धन्वन्तरी नगर चिटणीस नगर व आदर्श नगर येथील नागरिक देखील उपास्थित होते.
कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन च्या काळात जेव्हा लोक घराच्या बाहेर निघायला घाबरायचे, तेव्हा रस्त्यावर उतरून गिरीश भाऊ पांडव यांनी गरजू लोकांना धान्य वाटून सरळ हाताने मदत केली.