नागपूर ब्युरो : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात सत्तेत असलेल्या महा आघाडीतील काँग्रेस पक्षाला उद्देशून म्हटले आहे कि ओबीसी समाजाचा खरंच पक्षाला आणि त्याच्या नेत्यांना कळवला असेल, तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं”.
इथे ऐका भाजप चे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी आरक्षणावर काय म्हणाले
भाजप चे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, “शिवसेना आणि राष्ट्रवादी ओबीसी विरोधी आहे, हे मी आधीपासून सांगत आलोय. आता काँग्रेस चे आमदार अभिजीत वंजारी यांनीही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विरोधी असल्याचं सांगीतलंय. त्यामुळे काँग्रेसला आता ओबीसी समाजाचा खरंच कळवला असेल, तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं”.
डिसेंबर पर्यंत इम्पेरीकल डाटा गोळा करा
शिवाय राज्य मागासवर्गीय आयोगाने राज्यात ओबीसींची जातीनुसार जनगणना करण्याच्या हालचाली सुरु केल्याय, सरकारने लवकर डाटा गोळा करावा, पण ओबीसी समाजाचा फुटबॅाल करु नये, डिसेंबर पर्यंत इम्पेरीकल डाटा गोळा करुन, ओबीसींना आरक्षण द्यावं, अशा सुचना भाजप चे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारला दिल्याय.
इथे ऐका भाजप चे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी आरक्षणावर काय म्हणाले
2022 च्या निवडणुका विना ओबीसी आरक्षणाने होणार नाहीत
भाजप चे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तीन महिन्यात जे काही करायचे ते करा. मात्र डिसेंबर च्या आधी ओबीसी आरक्षणावर काहीतरी निर्णय घ्या, नाही तर महाराष्ट्रातला ओबीसी समाज या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही, 2022 च्या निवडणुका विना ओबीसी आरक्षणाने होणार नाहीत.