Home मराठी Pune । दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलात झाले डॉ. प्रकाश आमटे यांच्या खांद्याचे ऑपरेशन

Pune । दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलात झाले डॉ. प्रकाश आमटे यांच्या खांद्याचे ऑपरेशन

645

पुणे ब्युरो : दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे 3 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या खांद्याचे ऑपरेशन झाले. अनेक वर्षांच्या अंग मेहनतीने आणि वय वाढल्याने मसल कमजोर होऊन त्यांचा खांदा तुटला होता. डाव्या हाताच्या खांद्यावर डॉ.आशिष बाभुळकर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.

समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांचे सुपुत्र अनिकेत आमटे यांनी दिलेल्या माहिती नुसार, 72 व्या वर्षी सुद्धा समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांचे रोज वन्यप्राण्यांशी खेळणे आणि त्यांना खाऊ घालणे सुरू असते. 2012 मध्ये डॉ. प्रकाश आमटे यांच्या उजव्या खांद्यावर अशीच यशस्वी शत्रक्रिया डॉ. बाभुळकर यांनी केली होती.

अनिकेत आमटे म्हणाले, दीनानाथ हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. धनंजय केळकर यांचे आणि समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांचे अनेक वर्षांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सर्व चांगले झाले. दोन दिवसात सुट्टी मिळाली. मंगळवारी हेमलकसा ला पोहचू. अजून 2 महिने लागतील हात ठीक व्हायला. त्या नंतर फिजिओथेरपी.
पुण्यात आणि देशात कोरोना अजूनही असल्याने फारसे कोणाला कळविले नाही. डॉक्टरांनी पण सांगितले होते कोरोना चे नियम पाळा. गर्दी होऊ देऊ नका.

अनिकेत आमटे म्हणाले, आनंदवन सोमनाथ लोक बिरादरी प्रकल्प अजूनही पर्यटकांसाठी बंद आहे. पावसाळा संपल्यावर दिवाळीच्या सुमारास कोरोनाची परिस्थिती बघून प्रकल्प सुरू करू. तो पर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटणे सुरू राहील