Home मराठी गट ग्राम पंचयात पिपळा- घोगली येथे ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा

गट ग्राम पंचयात पिपळा- घोगली येथे ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा

558

नागपूर ब्यूरो: गट ग्राम पंचयात पिपळा – घोगली येथे आज देशाचा ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नरेश भोयर प्रामुख्यने उपस्थित होते. याप्रसंगी गावाचे प्रथम नागरिक म्हणून सरपंचाने समस्त ग्रामस्थांना देशाच्या अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच गावात व देशात एकता व अखंडता कायम ठेवण्याचे आवाहन देखिल करण्यात आले.

प्रमुख अतिथी उपसरपंच प्रभु भेंडे, ग्राम पंचयात सदस्य वनिता कावळे, शकुनबाई वाघ, वैशालीताई पांडे, ग्रामसेवक डि.म.धारपूरे, मुख्याध्यापक मंडपे, शीतलकुमार मेश्राम, अंगनवाड़ी सेविका, ग्राम पंचायत कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.