Home Maharashtra Maha Metro| जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केली मेट्रोची सफर

Maha Metro| जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केली मेट्रोची सफर

569

नागपूर ब्यूरो : कोरोना काळात नियम पाळत प्रवास घडविणाऱ्या नागपूर मेट्रो मधून नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी प्रवास केला. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी मेट्रोच्या झिरो माईल फ्रीडम पार्क स्थानकापासून सीताबर्डी इंटरचेंज स्थानकापर्यंत प्रवास केला. सुधाकर उराडे यांनी यावेळी त्यांना मेट्रोच्या संपूर्ण कार्याची आणि प्रगतीची माहिती दिली. कोरोना ला घेऊन प्रशासनातर्फे वेळोवेळी काढण्यात आलेल्या आदेशाचे आणि नियमावलीचे पालन करीत उत्तमोत्तम सेवा प्रवाशांना दिल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनापूर्वी मेट्रोने प्रवासी संख्येचा उच्चांक गाठल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

नागपूर शहरामध्ये नागपूर मेट्रोच्या रूपात अतिशय चांगली वाहतूक प्रणाली तयार करण्यात आली आहे, आंतराराष्ट्रीय दर्ज्याची पायाभूत सुविधा आज नागपूर शहरामध्ये उपलब्ध आहे हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. याचा जास्तीत नागरिकांनी उपयोग करावा असे मत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी व्यक्त केले. मेट्रोचे तिकीट दर सर्व सामान्य व्यक्तींना परवडणारे आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे शहराच्या कुठल्याही भागातून मेट्रो स्टेशन पर्यंत नागरिकांना पोहोचता येते. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून पैसे वाचविण्यास मदत होत असून पर्यावरणराखण्यास देखील मदत होते.

जिल्हाधिकारी आर. विमला यांनी मेट्रोच्या गतिमान कार्याचे कौतुक केले. मेट्रोचा प्रवास सुखकर असून कोरोनाकाळात सर्वात सुरक्षित प्रवास असल्याचे आपल्याला जाणवल्याचे सांगितले. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी, सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी मेट्रोचा अधिकाअधिक वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मेट्रो प्रवासापूर्वी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी मेट्रोने झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशनवर तयार केलेल्या फ्रीडम पार्कलाही भेट दिली. यावेळी महामेट्रोचे महाव्यवस्थापक ओपरेशन अँड मेंटेनन्स सुधाकर उराडे, कॉर्पोरेट कम्युनिकेशन उपमहाव्यवस्थापक अखिलेश हळवे उपस्थित होते.