Home हिंदी महा मेट्रो : सिताबर्डी ते प्रजापती नगर स्टेशन दरम्यान 10 कि.मी. ट्रॅक...

महा मेट्रो : सिताबर्डी ते प्रजापती नगर स्टेशन दरम्यान 10 कि.मी. ट्रॅक पूर्ण

903

नागपूर : महा मेट्रोच्या नागपूर येथील सिताबर्डी ते प्रजापती नगर कॉरीडोरचे कार्य जलद गतीने सुरु असून, रिच 4 या मार्गिकेवर सुमारे 16 कि.मी. (अप अँड डाऊन लाईन) मधिल 10 कि.मी. एवढ्या मेट्रो मार्गावर रूळ बसविण्याचे कार्य पूर्ण झाले आहे.

या मार्गावर महा मेट्रो देशातील 231 मीटर लांबीचा ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आनंद टॉकीज, सिताबर्डी ते कॉटन मार्केट पर्यत बनवित आहे. भारतीय रेल्वेच्या ट्रॅक वरून 100 मीटरचा एक स्पॅन (3 मीटरचा एक गर्डर) या रेल्वे ट्रक वरून राहणार आहे. तसेच मेट्रो या मार्गिकेच्या 87% व्हायाडक्ट चे कार्य पूर्ण झाले आहे.

सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान 8.30 किमीच्या या मार्गावर एकूण 9 मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे ज्यामध्ये कॉटन मार्केट,नागपूर रेल्वे स्टेशन, दोसर वैश्य चौक, अग्रसेन चौक, चितार ओळी, टेलीफोन एव्सचेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक, प्रजापती नगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे.