Home हिंदी पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे जिल्हाधिकारी यांना निर्देश

पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे जिल्हाधिकारी यांना निर्देश

528
कृषीमंत्री दादाजी भुसे करणार नागपूर जिल्ह्याचा दौरा, खासदार कृपाल तुमाने यांची माहिती
नागपूर : अति पर्जन्यमान व सतत पंधरा दिवस ढगाळ वातावरणामुळे नागपूर जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले आहे, झालेल्या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करावे, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. याशिवाय ते लवकरच नागपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी दौरा करणार आहेत.

ही माहिती रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी दिली. बुधवारी मुंबईत त्यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली. त्यापूवी रामटेक लोकसभा मतदार संघात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे अशा सूचना खासदार कृपाल तुमाने यांनी जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या पत्रातून केल्या आहेत.

रामटेक लोकसभा मतदार संघात येणारे व जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शेतकºयांनी पेरलेले 90 टक्के सोयाबीन पिवळे पडले आहे. शिवाय खोडकिडीने सोयाबीन पिकावर हल्ला चढविला असून खोड पोखरले आहे. फुले व शेंगा गळाल्या असून सोयाबीन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.  हीच परिस्तिथी धान पिकाची आहे. धानही पिवळे पडले असून त्यावर करपा व खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला आहे. याशिवाय, कापसावरही रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. कपाशीला आलेल्या पात्या गळू लागल्या आहेत.