गडचिरोली ब्युरो : रविवार दिनांक 19 सप्टेबर 2021 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके ताडगाव हद्दीतील मौजा मडवेली जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचेे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी जवानांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुद गोळीबार केला. बहादुर जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वंरक्षणासाठी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला असता जवानांचा वाढता दबाव पाहुन नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला. 21 सप्टेबर 2021 रोजी होणाऱ्या विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी आयईडी व कुकर बॉम्ब लावुन मोठी घातपाताची योजना आखली होती. जवानांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा कुटील डाव उधळुन लावण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश प्राप्त झाले आहे.
Gadchiroli police foiled such an attempt on September 19, 2021 in Madveli forest area under AOP Tadgaon of Bhamragadh division when during patrolling Naxals were driven away from their hideout. Naxal belongings and literature in large quantities have been seized from the area. pic.twitter.com/xbkCMxpMbK
— गडचिरोली पोलीस – GADCHIROLI POLICE (@SP_GADCHIROLI) September 21, 2021
चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळाच्या निरीक्षणावरून अंदाजे 35 ते 40 नक्षलवादी शिबीर लावून असल्याचे दिसून आले. घटनास्थळावरून आयईडी, कुकर बॉम्ब, मोठया प्रमाणावर पिट्टू व नक्षल साहित्य हस्तगत करण्यात यश प्राप्त केले. आयईडी व कुकर बॉम्ब हे अत्यंत सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले असुन जवानांनी नक्षलविरोधात महत्वपुर्ण कारवाई करत नक्षलवाद्यांचा मोठा शिबीर उधळुन लावण्यात यश मिळविले आहे. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सर,अपर पोलीस अधीक्षक अहेरी (अभियान) मनिष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक, समीर शेख सर (प्रशासन), सी-60 प्रभारी अभिजीत पाटील यांनी सदर नक्षल विरोधी अभियान यशस्वी करण्यासाठी अथक परीश्रम घेतले.
विशेष अभियान पथकाच्या जवानांच्या शौर्यपुर्ण कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले असून, सदर परिसरात नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्याचे संकेत दिले आहे.