नवी दिल्ली ब्युरो : सप्टेंबर महिना पूर्ण होण्यासाठी फक्त 10 दिवस शिल्लक आहेत आणि त्यानंतर ऑक्टोबर सुरू होईल. ऑक्टोबरच्या सुरुवातीला तुमच्या बँक आणि पगाराशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर तुमच्या पगारावर परिणाम होईल आणि बँकेत येणारा पगार कमी होऊ शकतो. या व्यतिरिक्त बँकेत असलेल्या पैशासंदर्भातील नियमातही बदल होणार आहेत, ज्याची आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे.
अशा स्थितीत जाणून घ्या की, बँकेशी संबंधित कोणते नियम बदलणार आहेत आणि त्याचा तुमच्या उत्पन्नावर कसा परिणाम होऊ शकतो. आपल्याला हे नियम देखील माहीत असले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही.
हातात कमी येणार पगार
वेतन 2019 कायद्याअंतर्गत भरपाईचे नियम ऑक्टोबरमध्ये सर्वत्र लागू होऊ शकतात, बहुतेक खासगी कंपन्यांनी ते लागू केले आहेत. या नियमांनुसार, तुमच्या पगारामध्ये येणाऱ्या भत्त्याचा हिस्सा आता 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. सोप्या शब्दात याचा अर्थ असा की, आता आपल्या पगारामध्ये मूळ वेतनाच्या 50 टक्के असणे आवश्यक आहे, जे अनेक कंपन्या खूप कमी ठेवतात. तुमचे वेतन अनेक भागांमध्ये विभागले गेलेय, ज्यात भत्त्याचा एक भागदेखील आहे. यामुळे तुमच्या खात्यात येणारा पगार कमी होऊ शकतो, उलट तुमच्या पीएफमध्ये जास्त पैसे जमा होऊ लागतील.
ट्रेडिंग खात्यासाठी केवायसी अनिवार्य
भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (SEBI) ने यापूर्वी ट्रेडिंग खात्यांमध्ये गुंतवणूकदारांसाठी केवायसी अनिवार्य केले होते. यापूर्वी केवायसी अद्ययावत करण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती, जी नंतर बदलून 30 सप्टेंबर करण्यात आली. आता गुंतवणूकदारांनी केवायसी करणे आवश्यक आहे. केवायसी तपशीलात पत्ता, नाव, पॅन, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, उत्पन्न श्रेणी इत्यादी अद्ययावत करणे आवश्यक आहे.
ग्राहकांनी मंजूर केल्याशिवाय ऑटो डेबिट नाही
आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार ग्राहकांना प्रथम त्यांच्या स्वयंचलित व्यवहारासाठी मान्यता द्यावी लागेल. उदाहरणार्थ, जर तुमच्या खात्यातून कोणतेही ईएमआय, मोबाईल बिल पेमेंट, वीजबिल, एसआयपी पेमेंट किंवा ओटीटी पेमेंट गेले तर आधी तुम्हाला ती रक्कम मंजूर करावी लागतील. यानंतरच व्यवहार अद्ययावत केले जातील, यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर सर्वत्र अपडेट करावा लागेल. ही प्रक्रिया OTP द्वारे पूर्ण केली जाईल. आरबीआयच्या नियमानुसार, बँकांना कोणत्याही ऑटो पेमेंटपूर्वी ग्राहकांना सूचना द्यावी लागेल आणि ग्राहकांनी मंजूर केल्यानंतरच बँक खात्यातून पैसे काढता येतील.