Home हिंदी नागपूरचे नवे आयुक्त म्हणतात- कोविड च्या रुग्णाशी गैरवर्तवणूक टाळा

नागपूरचे नवे आयुक्त म्हणतात- कोविड च्या रुग्णाशी गैरवर्तवणूक टाळा

745

नागपूर : नागपूर महानगर पालिका चे नवे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी शुक्रवारला पदभार स्वीकारला. यावेळी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले कि माणसाचे जीवन महत्वाचे आहे. कोविड झाला म्हणून एखाद्याचा तिरस्कार करू नये. रुग्नाशी कोणीही गैरवर्तवणूक करीत असेल तर त्यांचेवर योग्य ती कारवाही करण्यात येईल. प्रत्येकाला सन्मान मिळालाच पाहिजे.

आयुक्त पुढे म्हणाले की सर्वांनी संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरलेच पाहिजे, सार्वजनिक ठिकाणी डिस्टंसिंग मेंटेंन केली पाहिजे. ते म्हणाले की आता यापुढे कोविड पेशंट मिळाल्यामुळे कोणत्याही परिसरात टिनाची सीलिंग लावली जाणार नाही. Also Read – कलेक्टर रहते हाथों में फावड़ा लेकर की थी खुदाई, अब है नागपुर के नए मनपा आयुक्त

जनता सर्वात महत्वाची
प्रशासनासाठी सर्वात महत्वाची जनताच असते. आम्ही त्यांच्यासाठीच इथे आहोत. जनप्रतिनिधीं सोबतच आमचे प्रशासन जनतेशी योग्य समन्वय ठेऊन काम करेल. यावेळी मनपा चे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा उपस्थित होते.