Home Environment Maharashtra । राज्यातील 43 शहरं संयुक्त राष्ट्राच्या ‘रेस टू झिरो’मध्ये, कार्बन उत्सर्जन...

Maharashtra । राज्यातील 43 शहरं संयुक्त राष्ट्राच्या ‘रेस टू झिरो’मध्ये, कार्बन उत्सर्जन शून्यावर आणणार

626

मुंबई ब्युरो : महाराष्ट्रातील 43 शहरं संयुक्त राष्ट्राच्या ‘रेस टू झिरो’मध्ये (Race to Zero) सहभागी होणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. या 43 शहरातील कार्बन उत्सर्जन 2030 सालापर्यंत अर्ध्यावर आणण्याचा इरादा असल्याचं सांगण्यात आलं आहे. 2050 सालापर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं पर्यावरण आदित्य ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पुणे आणि नागपूरचा आधीच ‘रेस टू झिरो’मध्ये

राज्यातील मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि नागपूरचा आधीच ‘रेस टू झिरो’मध्ये समावेश आहे. यात आता नवीन 43 शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

आता ही शहरे रेस टू झिरोमध्ये सहभागी होणार

अचलपूर, चंद्रपूर, मालेगाव, पुणे, अहमदनगर, धुळे, मिरा-भाईंदर, सांगली-मिरज, अकोला, गोंदिया, नागपूर, सातारा, अंबरनाथ, मुंबई, नांदेड, शिर्डी, अमरावती, हिंगणघाट, नंदुरबार, सोलापूर, औरंगाबाद, इचलकरंजी, नाशिक, ठाणे, बदलापूर, जळगाव, नवी मुंबई, उदगीर, बार्शी, जालना, उस्मानाबाद, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, पनवेल, वसई-विरार, भुसावळ, कोल्हापूर, परभणी, वर्धा, बीड, लातूर आणि पिंपरी-चिंचवड

आदित्य ठाकरे काय म्हणाले…

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, राज्यातील मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांपाठोपाठ महाराष्ट्रातील 43 शहरांमध्ये शून्य कार्बन उत्सर्जनाची ‘रेस टू झिरो’ ही आंतरराष्ट्रीय मोहिम राबविण्यात येणार आहे. क्लायमेट विक, एनवायसी, 2021 आणि ग्लोबल सिटीझन लाईव्ह कॅम्पेनचा भाग म्हणून या शहरांना सहभागी करण्यात आले आहे. शाश्वत विकासाकरिता जगभरात होत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही या मोहिमेत सहभागी होत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.