Home Maharashtra नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पासून राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पासून राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

677

आरोग्याच्या नियमांचे मात्र काटेकोर पालन व्हावे

मुंबई ब्युरो : नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.

धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे.
धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.

धार्मिक स्थळं खुली ठेवण्यासाठी वाचा 17 मोठे नियम

1. धार्मिक स्थळांनी प्रवेशद्वारावर सॅनिटायझर तसच स्क्रिनिंगची व्यवस्था करणं अनिवार्य

2. ज्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत, फक्त त्यांनाच धार्मिक स्थळांच्या परिसरात प्रवेश

3.ज्यांनी मास्क घातलेला आहे किंवा तोंड झाकलेलं आहे त्यांनाच प्रवेश मिळेल

4.कोविड रोखण्यासाठी सुचना देणारे फलक लावणं अनिवार्य, तसच ऑडिओ व्हिडीओही धार्मिक स्थळांमध्ये टाईम टू टाईम लावले जावेत.

5. एखाद्या मंदिरात, धार्मिक स्थळात एकाच वेळी किती जणांना प्रवेश द्यायचा ते ट्रस्टनं ठरवायचं आहे. व्हेंटिलेशन, उपलब्ध जागा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. अर्थातच त्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत समन्वय ठेवावा.

6. प्रत्येकानं बुटं, चप्पला वाहनातच सोडाव्यात. कुटुंबियांनी आणि प्रत्येकानं ते स्वतंत्र ठेवावेत.

7. धार्मिक स्थळाच्या परिसरातली दुकानं, कॅफेटेरिया, स्टॉल्सनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं

8. येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यासाठी प्रॉपर मार्किंग करावी.

9. धार्मिक स्थळांमध्ये आत आणि बाहेर पडण्याचे वेगवेगळे मार्ग असावेत.

10. धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करताना दोघात कमीत कमी 6 फुटाचं अंतर असावं. याची जबाबदारी धार्मिक स्थळांच्या मॅनेजमेंटची असेल.

11. लोकांनी प्रवेश करण्यापूर्वी साबनानं हात धुवावीत, सॅनिटायजर मारावा.

12. धार्मिक स्थळांमध्ये बसताना सोशल डिस्टन्सिंग पाळला जावं. परिसरात जास्तीत जास्त मोकळी हवा राहील याची काळजी घ्यावी. एअर कंडिशन 24 ते 30 अंश सेल्सि. एवढं ठेवावं.

13. मुर्ती, धार्मिक ग्रंथ, पुतळे यांना हात लावता येणार नाही.

14. धार्मिक स्थळांवर कुठलंही मोठं कार्य ज्यामुळे गर्दी होईल असं करता येणार नाही.

15. भजन, किर्तन किंवा इतर धार्मिक गायन पूर्णपणे बंद असेल. पण धार्मिक गीतं वाजवता येतील.

16. कॉमन प्रार्थना चटई टाळावी. भक्तांनी त्यांची स्वत:ची चटई किंवा तत्सम कापड सोबत घेऊन यावे.

17. धार्मिक स्थळांमध्ये प्रसाद वाटणे, तुषार शिंपडणे अशा गोष्टी पूर्णपणे बंद असतील