Home हिंदी बिग बॉस 2020 एंट्री घेणार ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ची ‘दयाबेन’

बिग बॉस 2020 एंट्री घेणार ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ची ‘दयाबेन’

514

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय रिअलिटी शो असणाऱ्या बिग बॉस 2020 च्या सीझन 14 ची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मेकर्सकडून याबाबत वेगाने काम सुरू आहे. यावर्षी कोणकोण सामिल होणार याबाबत अस्पष्टता आहे, मात्र काही सेलिब्रिटींशी निर्मात्यांची चर्चा सुरू आहे. असे वृत्त समोर येत आहे की, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम दयाबेन अर्थात दिशा वकानीला देखील मेकर्सनी अप्रोच केले आहे

माहितीनुसार दिशा वकानीला प्रति दिवसासाठी मोठी रक्कम देण्याची ऑफर देण्यात आली आहे. दरम्यान दिशा किंवा कार्यक्रमाच्या मेकर्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विशेष म्हणजे सलमान खान अनेकदा दयाबेन च्या या शो मध्ये सुद्धा आपल्या चित्रपटांच्या प्रमोशन च्या निमित्ताने सहभागी झाला होता. यावेळी दयाबेन आणि त्याची केमेस्ट्री खूप जुळलेली दिसली. हे ही वाचा- केबीसी : ‘सेटबैक का जवाब कमबैक से’ देने लौट रहा है शो

दिशा वकानी दीर्घकाळासाठी ‘तारक मेहता…’ मध्ये दिसली नाही. यावरून ती गेले अनेक महिने चर्चेत आहे. ती या मालिकेत दिसली नसली तरी दयाबेन म्हणून असलेली तिची प्रसिद्धी आजही तेवढीच आहे.

आता निर्माते 14व्या सीझनची तयारी करत आहेत. हा सीझन देखील सलमान खान होस्ट करणार आहे. नुकताच या सीझनचा रंजक असा प्रोमो देखील शेअर करण्यात आला होता. 13 वा सीजन खूप लोकप्रिय ठरला होता. अश्यात आता दयाबेन येणार म्हटले तर ‘हे मां, माताजी!’ (Hey Maa, Mataji!) हां डायलॉग या सेट वर सुद्धा गाजणार तर. सोबतच दयाबेन चा गरबा सुद्धा लोकांचे मनोरंजन करेल हे निश्चित.