Home Social Nagpur । गट ग्रामपंचायत पिपळा (घोगली) येथे गांधी व शास्त्री जयंती संपन्न

Nagpur । गट ग्रामपंचायत पिपळा (घोगली) येथे गांधी व शास्त्री जयंती संपन्न

627

नागपूर ब्युरो : पिपळा (घोगली) येथे शनिवार, दिनांक २ ऑक्टोबर ला राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी स्वच्छ व सुंदर गाव निर्माण करण्यास गावकऱ्यांना सहकार्य करण्याचे आव्हान कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच नरेश भोयर यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्या वैशाली भोयर, उपसरपंच प्रभू भेंडे, सदस्य प्रकाश भोयर,सुनील रहाटे,वनिता कावळे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर धारपुरे तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान आज पासून सुरु करण्यात आले. अभियानातील प्रमुख महिला सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होत्या.

कार्याक्रमाचे प्रस्ताविक सहाय्यक शिक्षक शीतल कुमार मेश्राम यांनी केले तर आभार मुख्याधापक श्रीकृष्ण मंडपे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप लेंडे, सुरेश बागडे, गिरीश राऊत, मुकेश इंगळे, प्रकाश भोयर, श्रावण कडू, नरेश बागडे आदींनी परिश्रम घेतले.