खामगाव ब्युरो : देवता लाईफ फाउंडेशनतर्फे (Devta Life Foundation) 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान वंदे मातरम रक्तदान महायज्ञ आणि जनजागृती मोहीम रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या महायज्ञाची सुरुवात 1 ऑक्टोबर रोजी सकाळी सीताबर्डी, उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृत भवन येथे करण्यात आली होती. जनजागृती मोहीम रविवार, 3 ऑक्टोबर रोजी खामगाव येथे पोहोचली. येथून ही रॅली आजच जळगावला रवाना होईल.
देवता लाईफ फाउंडेशन तर्फे आयोजित रक्तदान जनजागृती अभियानांतर्गत आज खामगाव येथे सोनी रक्तपेढी येथे रक्तदान शिबिर आयोजित केले गेले. याप्रसंगी भारत विकास परिषद तर्फे रॅलीचे भव्य स्वागत केले गेले. तसेच एक कार्यक्रम आयोजित करुन किशोर बावणे यांना सन्मानित करण्यात आले. देवता फाउंडेशन तर्फे यावेळी रक्तदात्यांचा शॉल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच देवता फाउंडेशन तर्फे वामनराव बांगडभट्टी अध्यक्ष भाविप, सचिव सुनील जी अग्रवाल, प्रांत उपाध्यक्ष जगदीश तिवारीजी, कोषाध्यक्ष ओमजी संगवई, दीपकजी पेठे, डॉ.सोनी यांचा सत्कार केला गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रवि गि-हे यांनी केले.
यावेळी देवता लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे, कस्तुरी बावणे, सारिका पेंडसे, सुधीर बाहेती, नीलिमा बावणे, फोटो जर्नलिस्ट शेखर सोनी, कीर्तीभाई जसानी, मोहन तोडवानी, शशिशेखर देशपांडे, अनिल नेवारे, शशांक गुराडे इत्यादी उपस्थित होते.
राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांमधून जाणार रॅली
1 ऑक्टोबर पासून राज्याच्या वर्धा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वणी, उमरेड आणि पुणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देवता लाइफ फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी “आत्मनिभर खबर डॉट कॉम” ला दिली आहे. याला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 50 सायकल, 50 मोटारसायकल, 21 कार यांनी देवता लाईफ फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला आहे. जे राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांमधून जाईल. ही रॅली 5 ऑक्टोबरला मुंबईत पोहोचेल. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली जाईल. राज्यपाल रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील.
गडकरींनी नागपुरातुन केले होते रवाना
देवता लाईफ फाउंडेशन तर्फे आयोजित वंदे मातरम जनजागृती मोहीम रॅलीची सुरुवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवार, 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता केली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला होता. नागपुरातून शनिवारी निघालेली ही वंदे मातरम जनजागृती मोहीम महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये पोहोचत आहे.