Home Exam MPSC Exam । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा परीक्षा 2021ची जाहिरात प्रसिद्ध,...

MPSC Exam । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा परीक्षा 2021ची जाहिरात प्रसिद्ध, 2 जानेवारीला पूर्व परीक्षा

605

पुणे ब्युरो : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC ) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021जाहिरात प्रसिद्ध केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून एमपीएससीची एकही जाहीरात प्रसिद्ध झाली नव्हती. मात्र, अखेर 2021 ची मेगा भरतीचं वेळापत्रक एमपीएससीनं प्रसिद्ध केलं आहे. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार आहे. 2 जानेवारी 2022 ला होणार एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. परीक्षेच्या तीन महिने आधी एमपीएससीनं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आता एमपीएससीनं 2021 चं वेळापत्रक जाहीर केल्यानं 2022 चं वेळापत्रक कधी जाहीर करणार, असा सवाल विद्यार्थ्यांनी आयोगाला केला आहे.

असे असणार राज्य सेवा परीक्षेचे टाइम टेबल

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. 2021 च्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास 5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

या पदांसाठी होणार परीक्षा

उपजजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार राज्य कर आयुक्त 16 , गटविकास अधिकारी 15, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ 15, उद्योग उप संचालक 4, सहायक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहायक गटविकास अधिकारी 17, सहायक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमि अभिलेख 15 , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर 1, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1,सहकारी कामगार अधिकारी 54 पदांसाठी राज्य सेवा परीक्षा 2021 आयोजित करण्यात आली आहे.

राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित काही दिवसांपूर्वी निकाल जाहीर केला आहे. एमपीएससीनं या सदंर्भात परिपत्रक जारी केलं आहे. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. एमपीएससी 413 पदांचा निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा होती. अखेर निकाल अखेर जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.