Home Information Heavy Rain । नागपूर सह विदर्भात पुढील तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता

Heavy Rain । नागपूर सह विदर्भात पुढील तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता

593

नागपूर ब्युरो : महाराष्ट्रात नुकताच पावसाने धुमाकूळ घातला. मात्र पुन्हा एकदा नागपूर सह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने अलर्ट देत म्हटले आहे की पुढील तीन तासात विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल.

हवामान खात्याने आपल्या अलर्ट मध्ये म्हटले आहे की पुढील तीन तासात राज्याच्या नागपूर सह गोंदिया, गडचिरोली, भंडारा, वर्धा , यवतमाळ आणि चंद्रपूर या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने याच बरोबर असेही म्हटले आहे की राज्याच्या अकोला, वाशिम आणि अमरावती या पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सोबतच नांदेड आणि नाशिकात सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

विजांसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस
  1. गोंदिया,
  2. भंडारा,
  3. नागपूर,
  4. वर्धा,
  5. अमरावती,
  6. अकोला,
  7. गडचिरोली,
  8. चंद्रपूर,
  9. यवतमाळ,
  10. वाशिम,
  11. नांदेड
  12. नाशिक.

 

बातमी अपडेट होत आहे …