नागपूर ब्युरो : गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी च्या वतीने महाराष्ट्र बंद साठी महामोर्चा काढण्यात आला असून काँग्रेस पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते आज या मोर्च्या मध्ये सहभागी झाले. उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे शेतकऱ्यांना जिप खाली चिरडुन मारल्या जाते आणी योगी सरकार आरोपींना अटक करण्या ऐवजी केंद्रीय राज्यमंत्र्याचा मुलगा असलेल्या आरोपीची पाठराखण करते.
अश्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते गिरीश पांडव यांनी केली असून ह्याच क्रुर हत्याकांडाच्या निषेधार्थ आणी मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात आज महाविकास आघाडी च्या वतीने महाराष्ट्र बंद करण्यात आला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने माजी आमदार दीनानाथ पडोळे, महिला काँग्रेस अध्यक्ष सौ प्रज्ञाताई बडवाईक, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष सौ लक्ष्मीताई सावरकर, राहुल अभंग सोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दक्षिण नागपूर मधील सर्व व्यापारी संघटनाचे बंद ला सहभाग दिल्याने काँग्रेस कमेटी चे उपाध्यक्ष गजराज हटेवार यांनी आभार मानले.