Home Environment #Maha_Metro । मेट्रो स्थानकावर सायकल, ई-स्कुटर, ई-रिक्षाचे प्रमाण वाढवले

#Maha_Metro । मेट्रो स्थानकावर सायकल, ई-स्कुटर, ई-रिक्षाचे प्रमाण वाढवले

575

नॉन मोटराईज्ड ट्रान्सपोर्ट सिस्टम भक्कम करण्याचा महा मेट्रोचा प्रयत्न

नॉन मेट्रो परिसरात देखील मेट्रोची कनेटिव्हिटी


नागपूर ब्युरो : महा मेट्रोने नॉन मेट्रो परिसरात मेट्रोची कनेटिव्हिटी वाढविण्याच्या दिशेने पाऊले उचलले असून जास्तीत जास्त प्रवाश्यांना मेट्रोने जोडण्याचे प्रयत्न जोमाने सुरु केले आहेत. ज्यामध्ये शहरातील इतर भागांना मेट्रो स्टेशनशी जोडण्याच्या उद्देशाने फिडर सर्विसच्या माध्यमाने सायकल, ई-स्कुटर, ई-रिक्षाचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. आता नागपूर मेट्रोच्या विविध स्थानकांवरून मेट्रो नसलेल्या स्थळी पोहचण्यासाठी सायकल, ई- रिक्षा आणि ई -स्कुटर भाडेतत्त्वांवर प्रवाश्यांना वापरण्यास उपलब्ध असणार आहे.

व्हीआयपीएल कंपनीसोबत स्थानकांवर सायकली उपलब्ध करून देण्यासंबंधी सामंजस्य करार झाला आहे तर, ईटीओ कंपनीबरोबर स्थानकांवर ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रत्येक स्थानकावर आता या सेवा उपलब्ध असणार आहेत.

मेट्रो रेल्वेसह सर्व पद्धतींचे अखंड एकीकरण साध्य करण्यासाठी, महा-मेट्रोने त्याच्या सर्व स्थानकांवर मल्टी मोडल इंटिग्रेशन (एमएमआय) लागू केले आहे. नागपूर मेट्रोने नागपूर शहरासाठी मोटार नसलेली वाहतूक (एनएमटी) आणि पादचारी अनुकूल उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी समग्र दृष्टीकोन स्वीकारला आहे. शाश्वत जीवन जगण्यासाठी नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट व्यवस्था (एनएमटी) महत्वाची आहे. प्रदूषणापासून मुक्तता, अपघातमुक्त, निसर्ग जतन करणारी आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित, आरामदायक आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे महा मेट्रोचा मुख्य हेतू आहे.

प्रदूषण मुक्त फीडर सेवा देण्यावर भर

त्यामुळे मेट्रो निर्मितीसोबतच प्रदूषण मुक्त फीडर सेवा देण्यास म्हणजेच एनएमटीच्या वापरावर महा मेट्रोचा भर आहे. याच अनुषंगाने नागपूर मेट्रोचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. शिवाय एम.एम.टी.च्या प्रचारासाठी महामेट्रो नागपूर आघाडीवर आहे. या संस्थेने मेट्रो ट्रेन आणि सायकलचा वाहतुकीचा मार्ग म्हणून वापर करण्यास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले आहे. आगामी पिढ्यांसाठी एक चांगले आणि प्रदूषणमुक्त जग सुनिश्चित करण्यासाठी शाश्वत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हे उद्दीष्ट घेऊन नागपूर मेट्रो अनेक पाऊलं उचलत आहे.

फस्ट टू लास्ट माईल कनेटीव्हीटी

महा मेट्रो तर्फे मल्टी मॉडेल इंट्रिग्रेशनच्या अंतर्गत विविध सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे, मेट्रो प्रवास करताना प्रवासी स्वतःची सायकल देखील सोबत घेऊन जाऊ शकेल अशी सोय नागपूर मेट्रोने केलेली आहे ज्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या शिवाय सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग, प्रवाश्यांना उतरण्यासाठी विशेष जागा, पार्किंग व्यवस्था, रॅम्प अश्या विविध सुविधा असणारा मास्टर प्लॅन तयार करून निर्मिती केल्या आहेत. मल्टी मॉडेल इंटीग्रेशन अंतर्गत फस्ट टू लास्ट माईल कनेटीव्हीटी अशी संकल्पना असून याद्वारे प्रत्येक प्रवाशाला स्टेशनवरून वाहतुकीची सुलभ यंत्रणा उपलब्ध होणार आहे. या सर्व उपलब्ध फिडर सेवामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मेट्रो आणि फिडर सर्विसचा उपयोग करून प्रवास करावा असे आवाहन महा मेट्रो तर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

#Maha_Metro | रीच 2 पर तेजी से आकार ले रहे हैं मेट्रो स्टेशन, रफ़्तार से जारी है निर्माण कार्य