Home हिंदी अतिवृष्टि व पुरामुळे 4,911 कुटुंब बाधित : जिल्हाधिकारी

अतिवृष्टि व पुरामुळे 4,911 कुटुंब बाधित : जिल्हाधिकारी

478

नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर

> 28,104 व्यक्ती बाधित > 22,994 हेक्टर शेती क्षेत्र बाधित > 62 शेल्टर कॅम्प > 6,138 बाधित व्यक्तींना शेलटर कॅम्प मध्ये निवारा > 1,602 जनावरे मृत > 7,765 घराची पडझड > 50 जनावराचे गोठ्याचे नुकसान

नागपूर: अतिवृष्टी व पुरामुळे सिंचन प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीमध्ये सोडण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील 61 गावे बाधित झाली, यात 4 हजार 911 कुटुंबाचा समावेश आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आपती निवारण पथकाची मदत घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिली.
महसू ल विभागातर्फे बाधित क्षेत्रातील शेतीसह , नागरी भागातील नुकसानीचा पाथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे.
बाधित कुटुंब तात पुरत्या सुरू केलेल्या निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे, पारशिवणी तालुक्यातील सिंगरदीप या गावातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या 250 लोकांना हेलिकॉप्टर च्या सहायाने 750 अन्न पाकिटे, पाणी, आदी साहित्य पुरविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिली.