नागपूर ब्युरो : देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित होत आहेत. या सगळ्यात आघाडी घेत महा मेट्रो देखील कार्यक्रम आयोजित करीत आहे. `आझादी का अमृत महोत्सव’ शीर्षकांतर्गत हे सर्व कार्य्रक्रम महा मेट्रोसह देशात आयोजित होत आहेत. मेट्रोने या आधी देशभक्ती गीतांवर कार्यक्रम, सायकल फेरी सारखे उपक्रम राबवले आहेत. आता या उपक्रमा अंतर्गत मेट्रो मध्ये खादी आणि चरख्याचे व्हीडिओ दाखविले जात आहे.
याच शृंखलेत महा मेट्रोच्या ट्रेन मध्ये खादी आणि चरख्या संबंधी विडिओ दाखवले जात आहेत. खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन (केव्हीआयसी) ने हे व्हिडियो तयार केले असून, मेट्रो प्रवाश्यांनी याला पसंती दिली आहे. यात सर्वात पहिला विडिओ आपल्या देशाच्या इतिहासात खादीचे महत्व सांगणारा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी नेहमी खादी वापरत.
केव्हीआयसी अध्यक्ष व्ही. के. सक्सेना यांनी या संबंधी माहिती या व्हिडियोत दिली आहे. दुसरा व्हिडियो चरखा या विषयावर आहे. चरखा म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर सूत कातताना राष्ट्रपित्यांची प्रतिमा येते. या सोबतच बापूंचे सर्वात आवडते भजन – वैष्णव जन तो तेणे कहीये, जो पीर पराये जाने रे, देखील या व्हिडियोसोबत ऐकायला मिळते.
मेट्रो मध्ये दाखवले जाणारे हे व्हिडियो मेट्रो प्रवाश्यांच्या पसंतीला उतरले आहेत. या संबंधी बोलताना मेट्रो प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिक श्यामराव पाटील यांनी सर्व सामान्य नागरिकांमध्ये खादी लोकप्रिय करण्यासंबंधी सुरु असलेल्या मेट्रोच्या प्रयत्नांचे कौतुक केले. आपण मेट्रोने सातत्याने प्रवास करत असून खादी आणि चरख्याचे व्हिडियो बघून आनंद होतो, असेही ते म्हणाले. यामुळे नव्या पिढीत खादी संबंधी आकर्षण निर्माण होण्यास मदत मिळेल आणि खादीची विक्री याने वाढेल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
#ऑरेंजलाईन आणि #ऍक्वालाईन मार्गिकेचे नवे वेळापत्रक –
New Time Table – #OrangeLine & #AquaLine#NagpurMetro #TimeTable #CommercialService #Schedule #MaziMetro #MahaMetro #HappyMetroRide pic.twitter.com/jQApQbAg2F— Nagpur Metro Rail (@MetroRailNagpur) October 23, 2021
आपले मत मांडताना, स्थानिक रहिवासी श्रीमती कमला दुबे म्हणाल्या कि आपण महात्मा गांधींच्या विचारांचे पालन करतो. माझे वडील आणि आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. या प्रकारे चरखा आणि खादीचे व्हिडियो दाखवत महा मेट्रो स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना देत असल्याचे त्या म्हणाल्या.
या प्रकारे व्हिडियो दाखवल्याने तरुण पिढीवर चांगले संस्कार होतील असा विश्वास देखील नागपूरकरांनी व्यक्त केला आहे.
#Maha_Metro | महा मेट्रोला एक्सलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्टचा पुरस्कार जाहीर