मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा पगार थांबवण्यात आला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला आहे. परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीसंदर्भात गंभीर आरोप केले होते.
त्यानंतर चौकशीत परमबीर सिंगवर देखील वसुलीचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपासून परमबीर सिंग फरार होते. पोलीसांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते, मात्र तरी देखील सिंग चौकशीसाठी हजर न राहिल्याने त्यांना फरार घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परमबीर सिंग यांनी मुंबईतील अँटेलिया प्रकरणानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर कालांतराने सिंगवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर परमबीर सिंग मे महिन्यापासून सुट्टीवर गेले असून, ते अद्यापर्यंत परतलेले नाही.
ते कुठे गेले याची कल्पना त्यांच्या घरच्यांना देखील नसल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलीसांनी त्यांच्या घरी नोटीस बजावल्या नंतर देखील परमबीर हजर राहू शकलेले नाही. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्याचे निर्णय घेण्यात आले आहे.
#COVID19 । चीनच्या लान्झोउमध्ये लॉकडाऊन, 40 लाख लोकसंख्येला घरांमध्ये राहण्याचे आदेश