Home Covid-19 #COVID19 । गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण; वर्षभरात दुसऱ्यांदा झाला...

#COVID19 । गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण; वर्षभरात दुसऱ्यांदा झाला कोरोना

659
देशात कोरोनाचा वेग मंदावला आहे. ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. मात्र असे असतानाही कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरुच आहे. राज्याजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे पाटील यांना याच वर्षात दोनदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

त्यांनी स्वत: आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. ते देखील सध्या कोरोनावरील उपचार घेत आहेत.

गृहमंत्र्यांनी ट्विट करून दिली माहिती

गृहमंत्र्यांनी ट्विट करून आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली. सोबतच, आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि टेस्ट करून घ्यावी असेही ते पुढे म्हणाले. गृहमंत्र्यांनी लिहिले, “कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे.”

“नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे.” असेही ते पुढे म्हणाले.

#gadchiroli । सुरजागड रॅलीमध्ये सहभागी होणा-या नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीस दलाने केली अटक