Home Environment #nagpur । वायू प्रदुषणाबाबत जनजागृती, उभारला 12 फूट काळा चेंडू, सीएफएसडी आणि...

#nagpur । वायू प्रदुषणाबाबत जनजागृती, उभारला 12 फूट काळा चेंडू, सीएफएसडी आणि कामगारांचा पुढाकार

603

नागपूर ब्युरो : नागपूर शहरातून जमा केल्या जाणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे होत नसल्यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी शहरातील नागरिकांनी वेगळी वाट चोखाळली आहे. भांडेवाडी येथील डम्पिंग ग्राऊंडजवळ वायू प्रदूषणाची गंभीरता दाखविण्यासाठी तब्बल 12 फूट उंचीचा प्रचंड असा काळा बॉल शुक्रवारी उभारण्यात आला असून, त्याद्वारे हवा प्रदूषणाचा आरोग्यावरील गंभीर परिणाम अधोरेखित करण्यात आला आहे. सीएफएसडीने नुकत्याच्या केलेल्या एका सर्वेक्षणात नागपूरमधील 98 टक्के नागरिकांना कचऱ्याच्या वर्गीकरणाबद्दल जाणीव आहे, पण 78 टक्के नागरिक शहरातील कचऱ्याच्या प्रक्रिया व्यवस्थेबद्दल समाधानी नसल्याचे आढळून आले आहे.

या प्रचंड अशा बॉल जवळ ‘स्वच्छ हवा, स्वस्थ राहा’ हा संदेश असलेले फलक हाती घेऊन कचरा वेचणारे कामगार आणि “सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलमेन्ट’ (सीएफएसडी) या संस्थेच्या सदस्यांनी शुक्रवारी नागरिकांचे वायू प्रदुषणाकडे लक्ष वेधले. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छ हवा गरजेची असून हा मूलभूत हक्क असल्याचे यातून ठसविण्यात आले. नागपूर शहरातील नागरिक तसेच नागपूर महानगरपालिकेने कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी शाश्वत मार्गांचा वापर व्हावा यासाठी आग्रही राहावे ही यामागची संकल्पना आहे.

घरांमध्येच योग्य त्या शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याचे वर्गीकरण केले नाही तर नागपूर शहरातील हवा प्रदूषण वाढतच जाणार असून, आरोग्याची पातळीदेखील खालावणार असल्याचे या प्रचंड बॉलद्वारे दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच नागूपर शहरात कचरा जाळण्याचे प्रमाण हे शून्य असेल यासाठीदेखील कसून प्रयत्न करावे लागतील, असे सीएफएसडीच्या संस्थापक लीना बुद्धे म्हणाल्या. नागपूर महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी योग्य पद्धत हाताळावी यासाठी नागरिकांच्या सहभागाने मोहीम हाती घेतल्याचे बुद्धे म्हणाल्या.

#gadchiroli । गडचिरोलीत काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन, 1 नोव्हेंबरला कार्यकर्ता मेळावा आणि पदग्रहण सोहळा