Home Business #Maha_Metro | सुरक्षित, स्वस्थ आणि जलद वाहतुकीचे साधन नागपूर मेट्रो, दिवाळीच्या खरेदी...

#Maha_Metro | सुरक्षित, स्वस्थ आणि जलद वाहतुकीचे साधन नागपूर मेट्रो, दिवाळीच्या खरेदी करिता करा उपयोग

622
नागपूर ब्युरो : रोषणाईचा उत्सव असलेला दिवाळी सण आता अगदी काही दिवसांवर आला आहे. दिवाळी निमित्त बाजारपेठ देखील सजलेल्या आहेत. रांगोळी, पणत्या, आकाशदिवे सारख्या दिवाळी-स्पेशल वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत विक्रीला आहेत. विशेषतः कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दिवाळीच्या उत्साहाला उधाण आले आहे.

दिवाळीची खरेदी करण्याकरिता सिताबर्डी सारख्या बाजारपेठेत जायला महा मेट्रोच्या गाड्यांनी प्रवास करणे अतिशय उपयोगी आहे. महत्वाचे म्हणजे वर्धा रोड परिसराला किंवा हिंगणा मार्गाला लागून असलेल्या रहिवाशी भागातील नागरिकांना सिताबर्डी येथे येणे अधिकच सोपे आणि सुलभ आहे.

दिवाळी सण बघता नागरिक खरेदी करता बाजारपेठेत जात असून सुरक्षित वाहतुकीचे साधन मेट्रोचा उपयोग करू शकतात. नागपूर मेट्रोचे प्रवासी दर इतर वाहतुकीच्या साधनांपेक्षा कमी आहेत. महा मेट्रो नागपूरच्या प्रवासी सेवा सकाळी 6.30 ते रात्री 9 वाजता पर्यंत नागरिकांकरता उपलब्ध असून सुरक्षित, स्वस्थ आणि जलद वाहतुकीचे साधन म्हणून नागपूर मेट्रोचा जास्तीत जास्ती नागरिकांनी मेट्रोचा उपयोग करावा असे आवाहन महा मेट्रो नागरिकांना करीत आहे.

सिताबर्डी इंटरचेंज :

सिताबर्डी मेट्रो स्टेशन नागपूर मेट्रोचे इंटरचेंज असून वर्धा व हिंगणा मार्गावरील नागरिक इथे उतरून बाजारपेठेत जाऊ शकतात सिताबर्डी इंटरचेंच परिसरात बर्डी मेनरोड मार्केट, मॉल व अनेक दुकाने असून नागरिक या ठिकाणी खरेदी करता येत असतात.

काँग्रेस नगर मेट्रो स्टेशन :

अजनी रेल्वे स्टेशनला उतरल्यावर शहरातील अन्य भागात प्रवास करणाऱ्यांकरता महा मेट्रोने कॉंग्रेस नगर स्टेशनच्या माध्यमाने उत्तम सोय केली आहे. रेल्वे स्थानकावरून आपल्या घरी जाण्याकरता किवा आपल्या घरून नागपूर बाहेर प्रवासाकरता जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींकरिता महा मेट्रोचे हे स्थानक एक वरदान आहे. महा मेट्रोने अजनी रेल्वे स्टेशनच्या पहिल्या फ्लॅटफॉर्म येथून काँग्रेस नगर मेट्रो स्टेशनशी जोडले आहे.ज्यामुळे नागरिक सहज पणे मेट्रो स्टेशन परिसरात कुठल्याही अडथळ्याविना मेट्रो स्टेशन परिसरात पोहोचू शकतात. मेट्रो स्टेशनचे प्रवेश द्वार रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे.

कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन :

महा मेट्रोच्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉर वरील कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन प्रवाश्यां करता सुरु असून सदर,गड्डीगोदाम परिसरात जाणारे नागरिक या स्टेशनवर उतरून इतर ठिकाणी जाऊ शकतात. सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन-झिरो माईल फ्रिडम पार्क- कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रो सेवा नागरिकांन करता सुरु आहे तसेच खापरीकडे जाण्याकरता याच स्थानकावरून नागरिक मेट्रोचा उपयोग करू शकतात.

नागपूर मेट्रोचा प्रवास स्वस्त व सुरक्षित :

महा मेट्रोचे प्रवासी भाडे 5 रुपये ते 20 रुपये पर्यंत उपलब्ध आहे. खापरी ते लोकमान्य नगर-खापरी पर्यंतचा प्रवास 20 रुपये मध्ये करता येत असून सिताबर्डी ते खापरी व सिताबर्डी ते लोकमान्य नगर पर्यंतचा प्रवासा करता 10 रुपये मोजावे लागतील तसेच सिताबर्डी ते कस्तुरचंद पार्क स्टेशन करता फक्त 5 रुपये द्यावे लागतील.

  • सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर प्रवास – 10 रुपये, 20 मिनिटे: आता मेट्रोच्या मदतीने लोकमान्य नगर ते सिताबर्डी दरम्यान प्रवास फक्त 20 मिनिटामध्ये करू शकतात. सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान, झांशी राणी चौक, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनयर्स, शंकर नगर चौक, एलएडी चौक, धरमपेठ कॉलेज, सुभाष नगर, रचना रिंग रोड जंक्शन, वासुदेव नगर, बंसी नगर व लोकमान्य नगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे.

    सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन – 10 रुपये, 22 मिनिटे: सिताबर्डी ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यानचा प्रवास फक्त 22 मिनिटामध्ये करू शकतात. सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन काँग्रेस नगर,रहाटे कॉलोनी,अजनी चौक,छत्रपती चौक,नगर, उज्ज्वल नगर, एयरपोर्ट,साऊथ एयरपोर्ट,न्यू एयरपोर्ट व खापरी मेट्रो स्टेशनचा समावेश आहे.

  • सिताबर्डी ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन – 5 रुपये, 3 मिनिटे: सिताबर्डी ते कस्तुरचंद पार्क स्टेशन दरम्यानचा प्रवास फक्त 5 रुपये मध्ये करता येत असून यामध्ये सिताबर्डी इंटरचेंज – झिरो माईल फ्रीडम पार्क व कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनचा समावेश आहे.

#Maha_Metro | सीताबर्डी मेट्रो स्थानकावर पोलीस दिनानिमित्त शहीद पोलिसांना अभिवादन