Home National #Maha_Metro | महा मेट्रोला `एक्सेलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्ट’ पुरस्कार

#Maha_Metro | महा मेट्रोला `एक्सेलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्ट’ पुरस्कार

530

उत्कृष्ट मल्टिमॉडेल इंटिग्रेशन करिता मेट्रोची निवड


नागपूर ब्युरो : भारत सरकारच्या, गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय द्वारे महा मेट्रोला एक्सेलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्टचा पुरस्कार नागपूर मेट्रोला आज दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गृहनिर्माण आणि शहरी विकास श्री. हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना प्रदान करण्यात आला. मल्टिमॉडेल इंटिग्रेशन उत्कृष्टरित्या अंमलबजावणी करण्याकरिता महा मेट्रोची यामध्ये निवड करण्यात आली. अर्बन मोबिलिटी इंडिया 2021 (यूएमआय 2021) अंतर्गत झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. केंद्रीय गृह निर्माण आणि नगर विकास खात्याचे सचिव श्री दुर्गा शंकर मिश्रा या सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित होते.
2024 पर्यंत 50 शहरात मेट्रो सेवा: श्री हरदीप सिंह पुरी

शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून 2030 पर्यंत हा आकडा 60% पर्यंत जाणार असल्याचे केंद्रीय नगर विकास आणि पेट्रोलियम व वायू मंत्री श्री हरदीप सिंह पुरी आपल्या भाषणादरम्यान म्हणाले. जगातील ऊर्जेच्या एकूण उपयोगापैकी 30% वापर केवळ नागरी भागातील वाहतूक व्यवस्थेवर असेल, असे देखील ते म्हणाले. हि बाब लक्षात ठेवत शहरी भागात वाहतूक व्यवस्था कायम कशी ठेवता येईल या दृष्टीने कार्यक्रम आखल्याचे देखील ते म्हणाले. या कार्यक्रमांतर्गत देशातील 50 शहरांमध्ये 2024 पर्यंत मेट्रो सेवा सुरु असेल, ही माहिती श्री पुरी यांनी दिली.

श्री. दुर्गा शंकर मिश्रा सचिव, गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय, भारत सरकार : आपल्या भाषणात श्री मिश्रा यांनी संपूर्ण देशात नागरीकरण होत असल्याने उद्भवणाऱ्या वाहतूक समस्येवर प्रकाश टाकला. या समस्यांचा सामना करण्याकरता तयार राहण्याचे आवाहन त्यांनी केले. या वर्षी आयोजित झालेल्या अर्बन मोबिलिटी इंडियाच्या संमेलनाचा विषय ‘मोबिलिटी फॉर ऑल’ होता.

टीम वर्क आणि नागरिकांनी केलेले सहकार्य उत्तम – डॉ. ब्रिजेश दीक्षित 

टीम वर्क व नियोजन तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळेच महा मेट्रोला `एक्सेलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्ट’ पुरस्कार मिळाल्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे. प्रवाश्यांच्या हिताकरिता महा मेट्रोने अनेक उपाययोजना केल्या असून मल्टी मोडल इंटिग्रेशन याच प्रयत्नांचा एक भाग असल्याचे डॉ दीक्षित म्हणाले. एका दिवसाच्या या यूएमआय संमेलनात विविध विषयांवर चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले. यापैकी `बेस्ट प्रॅक्टिसेस इन इंटिग्रेटेड पब्लिक ट्रान्सपोर्ट’ विषयवार आयोजित झालेल्या चर्चासत्रात बोलताना, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी महा मेट्रो आणि मल्टी मोडल इंटिग्रेशन संबंधी माहिती दिली.`

`शहरात प्रकल्पाच्या सुरवातीपासूनच महा मेट्रोने हि संकल्पना राबवली असून दिव्यांगांना यात प्राथमिकता दिली. शहरातील ऑटो रिक्षा चालकांना सोबत घेत त्यांना याच संकल्पनेत भागीदार केले. मेट्रोने पार्किंग व्यवस्था निर्माण करण्याला महत्व दिले आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांकरता चार्जिंग पॉईंटची सोय केल्याचे डॉ. दीक्षित या चर्चासत्रात म्हणाले. नॉन-मोटराइझ्ड ट्रान्सपोर्टवर विशेष भर देत त्या संबंधी नागपूर महानगर पालिकेसोबत 20 वर्षाचे नियोजन केले असून त्या प्रमाणे अंमलबजावणी होणार असल्याचे डॉ. दीक्षित म्हणले.

मुख्य उद्दिष्ट :

महा मेट्रोने फीडर सर्विसची योजना आखत त्याची अंबलबजावणी केली. नागपूर मेट्रोने सर्व मेट्रो स्थानकांवर मल्टिमोडेल इंटिग्रेशनचे नियोजन केले आहे. बस सेवा, ई-रिक्षा, ई-बाईक, सायकल, ईलेक्ट्रिक स्कुटर अश्या विविध वाहतुकीच्या साधनांचे मेट्रो सेवे सोबत एकत्रीकरण करत मल्टी मोडल इंटिग्रेशनची संकल्पना महा मेट्रो शहरात राबवत आहे. शहरातील प्रवाश्याना जलद, सुरक्षित, शाश्वत आणि परवडणारा मार्ग उपलब्ध करून देण्याचा या मागचा मुख्य हेतू आहे.

महा मेट्रोने केलेल्या उपाय योजना :

महा मेट्रोच्या नागपूर प्रकल्पामध्ये मेट्रो स्थानकांवरील सुविधांच्या नियोजनाचा समावेश आहे. यात मेट्रो स्टेशनवर फीडर आणि सार्वजनिक वाहतूक बसेसच्या तरतूद आहे. तसेच शासनाने शिफारस केलेल्या धोरणांनुसार सायकल, दुचाकी आणि कार पार्किंग, दिव्यांगांकरिता पार्किंगची देखील सोय आहे. मेट्रो ट्रेन मध्ये सायकल सोबत नेण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मेट्रो स्थानकावर सायकल, ई-स्कूटर, ई-रिक्षा, फिडर बस, एयरपार्ट करीता शटल बस इ. ची व्यवस्था केली आहे.

गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय,भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा एक्ससेलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्टचा हा पुरस्कार महा मेट्रो आणि नागपूर शहराकरिता अभिमानाची बाब आहे. या पुरस्काराच्या पॅनेल मध्ये देशातील वाहतूक क्षेत्रातील तद्ध गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय, रत सरकारचे अधिकारी,सेंटर फॉर एक्सेलन्स अहमदाबादचे शिवानंद स्वामी, जागतिक संसाधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष तसेच इतर तज्ञचा या पॅनल मध्ये समावेश होता.महा मेट्रोच्या वतीने नागपूर शहरात राबविण्यात येत असलेल्या मल्टिमॉडेल इंटिग्रेशनचा विस्तृत आराखडा व सादरीकरण या पॅनल समोर सादर करण्यात आला.

#Maha_Metro | सुरक्षित, स्वस्थ आणि जलद वाहतुकीचे साधन नागपूर मेट्रो, दिवाळीच्या खरेदी करिता करा उपयोग