Home Diwali #Diwali । डीसीपी विनिता साहू यांनी घेतली बँक मॅनेजर्स, ज्वेलर्स, व्यापारी यांची...

#Diwali । डीसीपी विनिता साहू यांनी घेतली बँक मॅनेजर्स, ज्वेलर्स, व्यापारी यांची संयुक्त बैठक

652
नागपूर ब्युरो : शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11:40 वाजता पो.स्टे. सिताबर्डी येथे नागपुर शहराच्या पोलीस उपायुक्त (परिमंडळ 2) विनिता साहू यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने बँक मॅनेजर्स, ज्वेलर्स, व्यापारी यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त तुप्ती जाधव सुद्धा उपस्थित होत्या.

आगामी दिवाळी सणा निमित्त पोलीस स्टेशन सिताबर्डी, धंतोली व अंबाझरी या पोलीस स्टेशन हद्दीतील बँक मॅनेजर्स, ज्वेलर्स, व्यापारी यांची शनिवारी संयुक्तरित्या बैठक घेण्यात आली. सदर बैठकीला उपस्थित राहून पोलीस उपआयुक्त विनिता साहू यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. येणा-या दिवाळी सणा मध्ये कुठल्याप्रकारची काळजी घ्यावी, गुन्हे रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत त्यांनी यावेळी सर्वांना सुचना दिल्या.

शासनाने निर्गमित केलेल्या दिवाळी सण 2021 संबंधाने मार्गदर्शक सुचना बाबतची यावेळी सर्वांना माहिती देण्यात आली. सदर बैठकीत या तीन पोलीस स्टेशन परिसरातील 50 ते 60 बँक मॅनेजर्स, ज्वेलर्स, व्यापारी हजर होते. बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताबर्डी, धंतोली आणि अंबाझरी हजर होते. अशी माहिती सिताबर्डी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांनी दिली आहे.