Home Maharashtra @Dev_Fadnavis | पत्नीवरील आरोपांवर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले- नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध

@Dev_Fadnavis | पत्नीवरील आरोपांवर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले- नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध

469

आर्यन ड्रग प्रकरण आता अंडरवर्ल्ड कनेक्शनपर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सोमवारी जयदीप चंदुलाल राणा नावाच्या व्यक्तीचा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृतासोबतचा फोटो शेअर केला. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीच्या म्युझिक व्हिडिओला ड्रग पॅडलर राणा यांनी आर्थिक मदत केल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. फडणवीसांच्या आश्रयाने अमली पदार्थांचा व्यापार सुरू असल्याचेही ते म्हणाले.

त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसही माध्यमांसमोर आले. त्यांनी मलिक यांच्या आरोपांना हास्यास्पद म्हटले. फडणवीस म्हणाले, ‘मलिक माझ्यावर हल्ला करू शकत नाहीत, त्यामुळे ते माझ्या पत्नीवर हल्ला करत आहेत आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत. दिवाळी होऊ द्या, आम्ही बॉम्ब फोडू. नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचे पुरावे मी दिवाळीनंतर तुम्हाला देईन आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देईन.

फडणवीस यांच्या आरोपावर मलिक यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘आम्ही तयार आहोत.’ मलिक यांच्या आरोपावर अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, ‘उल्टा चोर कोतवाल को क्यों डांटे? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी’