मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राकां पदाधिकारी जावेद जकारिया यांनी लिहिले पत्र
नागपूर ब्युरो : मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंग, ज्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेवर अधिकाऱ्यांच्या मार्फत वसुलीचा आरोप लावला होता. सध्या ते स्वतः फरार असून कुठल्याही चौकशीकरिता हजर होत नसल्याने, त्यांच्यावर बक्षीस घोषित करून त्यांना पकडण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय महासचिव जावेद जकारिया यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
जावेद जकारिया यांनी म्हटले आहे कि जेव्हा की अनिल देशमुख आपली तब्येत खराब असतानाही ईडीच्या कार्यालयात आज हजर झाले व त्यांनी आपण कुठलाही गुन्हा केला नसल्याने कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे एका ट्विटरद्वारे सांगितले. ते ईडीच्या अधिकाऱ्यांना सहयोग करत आहेत. तर परमवीर सिंग ज्यांनी आरोप केले ते मात्र फरार आहे. सीबीआय शंभर करोड वसुली प्रकरणाचा तपास करत आहे.
ईडी द्वारे अनिल देशमुखांवर मनी लॉन्ड्रिंग च्या केस ची चौकशी केली जात आहे. त्या चौकशीच्या अनुषंगाने आज अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. यावरून हे स्पष्ट होते की अनिल देशमुख कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहेत. तर परमवीर सिंह ज्यांनी अनिल देशमुख यांची तक्रार केली ते मात्र फरार आहेत. यावरून हे सिद्ध होते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या संघटनेसाठी अनिल देशमुख एक महत्त्वाचे नेता मानले जात होते, त्यामुळे त्यांनाच कमजोर केल्याने विदर्भात राष्ट्रवादी कमजोर होईल म्हणून हा सगळा खेळ खेळल्या जात आहे. जकारिया यांनी मुख्यमंत्रांना माजी पोलीस कमिशनर परमवीर सिंग यांच्यावर सरकारने बक्षीस ठेवून त्यांचा पत्ता देणाऱ्याला बक्षीस म्हणून काही रक्कम देऊन त्यांचा शोध लावावा, अशी मागणी केली आहे.