Home Diwali #Diwali । ह्युमॅनिटी सोशल फाऊंडेशनच्या वतीने गोरगरीब मुलांना भेटवस्तू वाटप करून दिवाळी...

#Diwali । ह्युमॅनिटी सोशल फाऊंडेशनच्या वतीने गोरगरीब मुलांना भेटवस्तू वाटप करून दिवाळी साजरी

617

नागपूर ब्युरो : दिवाळी सणाला फार महत्व आहे. गरीब असो की श्रीमंत आपआपल्या परीने दिवाळी सण साजरा करतात. परंतु, गोरगरीब मुलांसोबत सण साजरा करून त्यांचा आनंद व्दिगुणीत करण्याच्या उद्देशाने ह्युमॅनीटी सोशल फाऊंडेशन मागील अनेक वर्षांपासून गरीब मुलांना भेटवस्तू वाटप करून दिवाळी सण साजरा करीत आहेत. दिवाळी हा आनंदाचा सण. दिवाळीत नवे कपडे, मिठाई, फटाके फोडल्या शिवाय दिवाळी कुठेच साजरी होऊ शकत नाही. दिवाळी हा सण सगळीकडे आनंदात साजरा व्हावा ही सगळ्यांचीच ईच्छा असते.

पण अनेक वेळा प्रश्न निर्माण होतो तो पैशाचा. कुणाकडे साधे जेवायलाही पैसे नाही. तर कुणाचा पैसा स्वत:च्या मौजमजा करण्यात उडण्यात जातो. परंतु आजही समाजामध्ये असे अनेक गोरगरीब आहेत ज्यांना दोनवेळचे साधे खायला मिळत नाही. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण करता येत नाही, म्हणून सामाजिक दायित्व ओळखून नागपूर शहरातील सामाजिक कायार्चा वसा घेऊन काम करणाऱ्या ह्युमॅनिटी सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा पूजा मानमोडे यांच्या नेतृत्वात फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी स्वतःच्या पैश्यानी नवीन कपडे, फटाके, मिठाई विकत घेऊन गरीब मुलांना नवीन कपडे, मिठाई, फटाके व ईतर अनेक भेटवस्तू देऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करून अंधारलेल्या आयुष्याला प्रकाशमय करण्याचे काम केले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

गरजुंच्यासाठी कणव निर्माण करणारी संवेदनांची पणती,अंधाराचा अंध:कार दूर करणारी पणती व्हा. दिवाळीच्या दिवसातही दिवाळी साजरी करु न शकणाऱ्यांना आपण कपडे, दिवाळीचा फराळ व संवेदनांचा दिप लाऊ शकतो. त्यांच्याबद्दल कणव निर्माण करणारा संवेदनांचा दिप लावला पाहीजे. आपणही अशी संवेदनांची दिवाळी साजरी करावी. जेथे दिवाळीचा दिप पेटत नाही, तेथे संवेदनांची पणती लावून या पणत्यांची दीपमाळ बनावी. आपणही दिपमाळेतला एक दिपासम व्हावे असे आवाहन ह्युमॅनीटी सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्ष पूजा मानमोडे यांनी केले आहे.

यावेळी पूजा मानमोडे, रुपाली टीचकूले, मनीषा श्रीपाद, अनिता कुंभारे, चेतना पडोळे, पायल निनावे,अबोली येनूरकर, स्वाती अहिरराव, कल्याणी चौधरी, आरती माटे, शिल्पा शाहीर, पूर्वा श्रीरंग, प्रसाद मानमोडे उपस्थित होते.

#Diwali | छोटी दिवाली- नरक चतुर्दशी आज, जानिए शुभ मुहूर्त, पूजा विधि और महत्व