Home Defence #Diwali। भारत-पाकिस्तान सीमेवर दिवाळी साजरी, जवानांनी एकमेकांना दिली मिठाई

#Diwali। भारत-पाकिस्तान सीमेवर दिवाळी साजरी, जवानांनी एकमेकांना दिली मिठाई

692

नवी दिल्ली ब्युरो : भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी लष्करामध्ये दिवाळीनिमित्त सीमेवर गुरुवारी मिठाईची देवाणघेवाण झाली. नियंत्रण रेषेवरील (एलओसी) क्रॉसिंग पुलावर भारतीय आणि पाक सैन्यांनी एकमेकांना मिठाईची दिली. दिवाळी, होळी, ईद यांसारख्या प्रमुख सणांच्या दिवशी भारतीय आणि पाकिस्तानी लष्करामध्ये सीमेवर एकमेकांना मिठाईची दिण्याची परंपरा आहे.

गुजरातमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि राजस्थानच्या बारमेर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाक रेंजर्समध्येही मिठाईची देवाणघेवाण झाली.

बीएसएफच्या जवानांनी बुधवारी रात्री भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) सोबतपण सण साजरा करण्यासाठी मिठाईची देवाणघेवाण केली. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गुवाहाटी सीमा रक्षकांनी भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर बॉर्डर गार्ड बांगलादेश (BGB) सोबत मिठाई आणि शुभेच्छांची देवाणघेवाण केली ,” गुवाहाटी फ्रंटियर (BSF) च्या अधिकृत हँडलने ट्विट केले.

#Diwali | वो स्थान जहां श्रीराम ने चट्टान से निकाला था जल, यहां का पानी आज भी नहीं सूखता